Thursday, February 9, 2023

शेतकऱ्यास न्याय द्या सरकार

कितीही मांडले उपोषण आम्ही 
तरी शेतकऱ्यांना न्याय मिळतच नाही
चढले जरी फासावर आम्ही
तरी कापसाला भाव मिळतच नाही....

कितीही भांडलो कितीही रडलो 
जशाच्या तसं मात्र सरकार आहे
खुर्चीतले फक्त नेते बदलेले
तिच्यावर जशाच्या तसा भार आहे....

कितीही मांडल्या व्यथा शेतकऱ्याच्या
तरीही सरकार मात्र शांत आहे
कधीतरी जाणावं शेतकऱ्याच मन ही
त्याच्या मनात सुटलेलं वादळ आहे.....

शांत करा सरकार मायबाप
हे वादळ त्याच्या मनातलं
ओळखा तुम्ही ही त्याला
सळसळत रक्त आहे त्याच्या नसातलं....

द्या हो त्याच्या मालाला भाव
नसानसात रक्त त्याच सळसळत आहे
अख्या जगाचं पोट भरण्याची ताकद 
फक्त माझ्या शेतकरी बापातच आहे......


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...