आम्ही सावित्रीची मुले
मुलींच्या भविष्यासाठी तिने
शिक्षणाचे भांडार केले खुले
स्त्री शिक्षणासाठी तिने
उभा जन्म बाई वेचला
सुखाचा त्याग करुनी
इतिहास तिने बाई रचला
सोबतीला जोतिबांच्या
खंबीरपणे राहिली उभी
अजरामर होऊनी दोघे
त्यांची कीर्ती पसरली नभी
दगड गोटे खावूनी
अत्याचार तिने साहीला
स्त्री उद्धारासाठी बाई
उभा जन्म तिने वाहिला
समाजाने अंगावर त्यांच्या
चिखल शेणाचा फेकला
पण जोतिबांच्या साथीने
मुलींच्या शिक्षणाचा
पाया त्यांनी रचला
कधी विसरलो तुझी शिकवण
तर परत ये कान धरायला आई
सावित्रीच्या लेकी आम्ही
सावित्री आमची आई
वारसा स्त्री शिक्षणाचा
अविरत चालू ठेवू
सावित्रीच्या महान कार्याला
अभिवादन आम्ही देऊ
No comments:
Post a Comment