पायात काटे माझ्या
पण कधी डगमगले नाही
स्वप्न होते मनात माझ्या
मी कधीच हरलो नाही
साथ कुणाची नसतानाही
मी माघार कधी घेतली नाही
जबाबदारीच ओझं वाहताना
मी कधीच पडलो नाही.....
मी कधीच हरलो नाही...
जिंकायचं होत मला हे आयुष्य
ध्येयाची वाट मी कधी सोडली नाही
धडपडत फरफटत होतो मी
मी कधीच रडलो नाही....
मी कधीच हरलो नाही...
अनेक आले वाटेत काटे माझ्या
तरीही एक एक पाऊल पुढे टाकत गेलो
साथ होती फक्त नशीबाची मला
स्वप्न नवे आयुष्याचे रंगत गेलो
अवघड होत्या त्या प्रत्येक वाटा
आयुष्याच्या वळणावरती
तरीही अफाट प्रयत्न करत गेलो
कधीही झुकलो नाही कुणासमोर
स्वतःवर विश्वास ठेवत गेलो
लाख रुतले होते हो
पायात काटे माझ्या
पण कधी डगमगले नाही
स्वप्न होते मनात माझ्या
मी कधीच हरलो नाही
No comments:
Post a Comment