स्वप्नांच्या दुनियेत तू मला घेऊन जातो....
स्वप्न आहे की सत्य कळत नाही मला
आठवणींचा पावसात भिजवून मला जातो...
रिमझिम ती सर, पाऊसधारा
अन् सोबत थंड थंड वारा
मनाची घालमेल करून जातो....
स्वप्न बघतेय की वास्तवात आहे
कळत नाही मला..... पण
आठवणींच्या पावसात तू भिजवून मला जातो....
क्षणोक्षणी आभास तुझा मला होतो....
सायंकाळ झाली असता
पक्षांचा किलबिलाट चालू होतो....
तुझ्यात मन गुंतूनी....
कोकीळ तुझीच गाणी गातो....
स्वप्न आहे की हा आहे माझा भास
कळत नाही मला.... पण
क्षणोक्षणी आभास तुझा मला होतो....
क्षणोक्षणी आभास तुझा मला होतो....
स्वप्नमयी.....✍🏻✍🏻✍🏻
No comments:
Post a Comment