असे खूप वाटायचे मला....
प्रेम ओठातून व्यक्त व्हावं आणि
श्वासातून स्पंदन व्हावं
अशा अपेक्षा ही मनात बऱ्याच होत्या काही....
पण तुला माझी प्रेमाची परिभाषा
कधी कळलीच नाही.....
आपल्यात नेहमी निस्वार्थ प्रेम असावं
ते नेहमी न बोलताच व्यक्त व्हावं....
या निस्वार्थ प्रेमाला नितळ पाण्यासारख जपावं....
अशा अपेक्षा ही मनात बऱ्याच होत्या काही...
पण तुला माझी प्रेमाची परिभाषा कधी कळलीच नाही....
.
.
.
.
.
.
शेवटी वेळ निघून गेली....
माझं आयुष्य होतास.....
कालांतराने कुणाचं आयुष्य होऊन गेलास....
अस होऊन जाईल
असे मी कधी जानलेच नाही....
पण तुला कधी माझी प्रेमाची परिभाषा कळलीच नाही.....
सहजच सुचलेलं.....
🤗
✍🏻✍🏻✍🏻
No comments:
Post a Comment