Thursday, May 26, 2022

लेखणी माझी....

अविरत झुलत असते ती वेल 
पाण्यावर तरंगताना
ऋतू गंध मनी दरवळतो 
सरी रिमझिम पावसात झरताना

सायंकाळच्या वेळी शब्द माझे ओसंडून जावे
तुझ्यावर कविता मी लिहिताना
पुस्तकाचं पान ही न दिसावं 
तुझ्यात मी हरवतना

तो केवडा ही निशब्द व्हावा 
तू लेखणीतून माझ्या उतरताना
इतका मोहक व्हावास तू
त्या कोऱ्या कागदावर गिरवतांना

उजळल्या दाही दिशा
तू सोबत माझ्या असताना
शब्द माझे अवतरले
लेखणी माझी गवसली
तू भावना माझ्या होताना

कविता पूर्ण होते माझी 
तुला लेखणीतून माझ्या लिहिताना
अजूनच घट्ट होत नातं आपलं 
तुझा सहवास असताना

स्वप्नमयी....✍🏻✍🏻✍🏻

No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...