Tuesday, October 5, 2021

हे असच नाही राहणार

 हे असच नाही राहणार

एक दिवस तू मला विसरणार

आज तर तू माझाच आहेस 

पण उद्या कुणाचा तरी होऊन जाणार


एक दिवस आपली भेट ही होणार 

तेव्हा आपली नजरानजर ही होणार 

तुला भेटण्यासाठी माझा जीव 

कासावीस होणार

पण तू मात्र तिथून निघून जाणार


कदाचित कुणीतरी माझ्या पेक्षा जास्त 

प्रेम करणारी तुझी वाट पाहत आहे 

म्हणून माझ्याकडे तू दुर्लक्ष करणार

आज तर तू माझ्या खूप जवळ आहेस 

पण उद्या तू दुसऱ्या कुणाचा तरी होणार

म्हणून आतापासूनच तुझी सवय मी मोडणार


मला माहित आहे हे असच नाही राहणार

ही वेळ पण कुठच नाही थांबणार 

एक दिवस सगळ काही बदलणार

एक दिवस सगळ काही बदलणार.....😔😔😔



Sapna patil.... ✍️



No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...