दूर कुठेतरी निसर्गरम्य वातावरणात जावं
तिथं फक्त आपण दोघच दुसर कुणीच नसावं
तिथला थंड मनमोहक गारव्यान
अंगाला झोंबत मी धुंद धुंद व्हावं
निसर्गाच्या कुशीत तू मला अलगद टिपावं
तेवढ्यात रिमझिम पावसानं यावं
विजेचा कडकडाट होताच...
मी तुझ्या अजून जवळ यावं
आणि तू मला घट्ट मिठीत घ्यावं...
तुझ्या एका स्पर्शाने मी तुझ्यात बुडून जावं...
मी तुझ्या केसांना अलगद धरावं
आणि तुझ्या डोळ्यात मला शोधावं....
मी तुझ्या डोळ्यात दिसताच मी मोहरुन जावं....
मग तुझ्या ओठांचा स्पर्श माझ्या ओठांवर व्हावा
आणि मी पूर्ण तुझ्यात गुंतून जावं....
हळूहळू तुझ्या ओठांचा स्पर्श माझ्या मानेवर व्हावा
तुझ्या ओठांचा स्पर्श होताच मी माझीच न रहाव...
तू माझ्या एवढ्या जवळ यावं....
की आपल्यातून जाणाऱ्या
वाऱ्याने सुद्धा स्तब्ध होऊन जावं.....
आणि ही वेळ इथंच थांबावी असच वाटावं
ही वेळ इथंच थांबावी असच वाटावं....
आणि हे सगळ मी स्वप्नातच पहावं.....
हे सगळ मी स्वप्नातच पहावं......😜😃😃😃
Sapna patil....✍️✍️✍️
No comments:
Post a Comment