जेव्हा आपण भेटलो तेव्हा
आपण अनोळखी होतो
हळूहळू ओळखीचे होते गेलो
तुझ्या शिवाय मला करमेना
माझ्या शिवाय तुला करमेना
एकमेकांत गुंतत गेलो
एवढे गुंतलो की आता तुझ्याविना
जगणं खुप कठीण झालंय
तू आलास आणि माझं
आयुष्य होऊन गेलास
आपल्या आयुष्यात काही
उचनीच झाली तर मला नाही रे
जमणार तुझ्याशिवाय हे आयुष्य जगणं
कधीतरी समजून घे ना मला
मी तुझीच आहे अस वाटत नाही का तुला
एवढं पण रागावू नकोस
नाही येणार मला मनवयला तुला....
Sapna patil ✍️✍️
No comments:
Post a Comment