तूझ्या आठवणींचा पाऊस..
बघ ना रे आज मला तो किती आठवतोय...
तू जसा पावसात चिंब भिजायचा
बघ ना आज मी ही अगदी तशीच भिजतेय
बघ हा पाऊस ना थांबायचं नावच घेत नाही
तरी तो मला खूप कमीच वाटतोय...
तू गेलास तेव्हापासून फक्त हा
पाऊसच माझ्या सोबत राहतोय....😢😢
त्या ओल्या सांजवेळच्या सरित
मी जेव्हा शाल पांघरूण बसते
तेव्हा तुला खर सांगू का तुझ्या
सुंदर मिठीचा स्पर्श मी भासते....
बघ ना तो पाऊस किती बेभान
होऊन माझ्यावरती बरसतोय.....
कदाचित आज तो ही माझ्यासोबत रडतोय
............आज तो ही माझ्यासोबत रडतोय....😔😔😢
.....sapna patil.....✍️
No comments:
Post a Comment