Tuesday, October 5, 2021

अपेक्षा असते तुझ्या उत्तराची

 नेहमी हीच अपेक्षा ठेवते की तू येशील परत

पण जेव्हा भानावर येऊन कळते 

की तू नाही येणार परत 

तेव्हा समजूत घालते मी स्वतःची 

समजावते या मनाला नेहमी की तो गेलाय

तो आता येणार नाही परत

तरी मन मात्र वाट बघते त्याच्या येण्याची

नेहमी हीच अपेक्षा असते की एक 

दिवस देईल तो माझ्या प्रश्नाचं उत्तर 

की का गेलाय तो मला सोडून 

खूप वाट बघतेय त्याच्या उत्तराची....

भानावर येऊन समजूत घालत असते स्वतःची 

की तो मलाच नाही तर हे जगच सोडून गेलाय

तो कधीच येणार नाही परत 

नको अपेक्षा ठेऊ तू त्याच्या येण्याची...


Sapna patil....✍️



No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी