मन आभाळ सारखं भरून आलंय रे आज
खूप आठवण येतेय तूझी....
तू असता स तर तुझ्या कुशीत येऊन मन मोकळं केलं असत मी... कुठे आहेस रे सांग ना मला
मला यायचं आहे तुझ्याजवळ....कुठे लपून बसलाय स तू
आज खूप आठवण येतेय तुझी....
डोळे भरल्या नभासरखे भरून आलेत...
मनात तुझ्या आठवणीचा काहूर माजलाय....
तू नाहीय या कल्पनेने अंगावर काटा उभा राहतो रे
तरीपण तुझ्या आठवणींसोबत जगत आहे.
तुझ्यासारखे प्रेम कुणीच केलं नाही माझ्यावर....
आज तुझी खूप आठवण येतेय....
नाही सावरू शकत आहे मी स्वतःला....
तू तरी ये ना मला सावरायला...
आज खूप मन भरून आलंय रे माझं....
सांग ना कुणाजवळ हलक करू या मनाला....
कुणीही येत आणि काहीही बोलून जात तुझ्या प्रेमाला
हे आवडत का रे तुला....
सांग ना रे एकदा तरी....
आज खूप एकट एकट वाटतंय रे मला...
एकटी पडलेय मी तुझ्याविना....
आज सर्व काही माझ्याकडून हिरावून घेतल्यासारख वाटतंय....
मनात वार्याच उधाण सुटलाय...
मन रडकण्यासारख झालंय....
जणू वेळ कशी इथंच थांबून गेलीय...
जीव आतल्या आत गुदामारल्यासारखा झालाय....
कशी सावरू स्वताला कळत नाहीय रे....
आज खूप आठवण येतेय तुझी....
कुणीच नाहीय माझं....😢😢😢
आता तू पण माझा राहिला नाहीय अस वाटतंय....
ठीक आहे माझ्या आयुष्याला जर हेच मान्य असेल तर मला पण मान्य करावच लागेल....
पण आज खूप आठवण येतेय तुझी.....
तू का गेलास मला सोडून....
हे जग सोडून....
Sapna.....✍️
No comments:
Post a Comment