Tuesday, October 5, 2021

एकटा जीव

 रडू तर खूप येत असत

पण डोळ्यात दिसत नसत

चेहरा तर कोरडाच असतो

पण मन मात्र भिजलेलं असत

कारण डोळे पाहणारे तर 

भरपूर असतात पण... 

मनातल जाणून 

घेणार कुणीच नसत...

वेळेपुरते जीव लावणारे 

तर खूप असतात  

पण जीवाला जीव

लावणार कुणीच नसत

डोळे तर भरून येतात 

भरल्या नभासारखे

पण त्यांना लपवायला 

कुणीच नसत....

मनात उधाण वाऱ्याच 

खूप गतीने सुटतं

पण त्याल थांबवणार 

पण कुणीच नसत

म्हणून या एकट्या जीवाला 

एकटच जगायच असत

कारण त्याला सावरायला 

कुणीच नसत 

त्याला स्वतःलाच 

समजवायच असत....


Sapna patil.... ✍️



No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...