Monday, December 18, 2023

6 डिसेंबर

जनसागर ही आक्रोश करत होता
निळा सागर ही आज ढसा ढसा रडत होता. 
प्रज्ञासुर्याचे महापरिनिर्वाण पाहून 
लाटांना ही उधाण सुटले होते.
का कुणास ठाऊक 
पण आज सारं रान पेटले होते
मनामनात उचंबळ उडाली होती 
कारण आजच्याच दिवशी 
बाबासाहेबांनी हे जग सोडले होते.....


आई

आई तुझा स्पर्श होताच 
बाळ थांबवते रडणं
काय जादू ग तुझ्यात
गाऊ लागते ते गाणं.....

मायेची ऊब तू आई
डोक्यावरची ग सावली
पावलागणिक साथ देते
धन्य तूच ग माऊली.....

संस्काराची विचारधारा तू
आई तू करुणेचा सागर 
जन्म देऊनी तू मजला
जीवनास दिला ग आकार...

काळजाच्या गाभाऱ्यात 
रोजच तिच्या असे अंधार
ऊन येते डोईवर 
तरी कष्ट करते अपार...

संसाराचा गाडा ओढता ओढता
नाही हिंमत तुझी ग हरली
बाप माझा होऊनी दिवा
तू वात होऊनी जळली....

sapna patil....✍🏻

Monday, December 4, 2023

कधी कळेल का

कधी कधी वाहवून द्यावस वाटतं स्वतःस
त्या ओझरत्या झर्यासारखं....
सर्व काही रितं करावं त्याच्याजवळ
मनातील गुजगोष्टीना
बेधुंद उडणाऱ्या पाखरासारखं...
कधी कळेल त्यालाही माझ्या मनातलं 
अन् सुखावून जाईल मी
मग नातं होईल घट्ट आमच्यातल 
माय लेकरा सारखं



......✍🏻

मन अधीर अधीर व्हावं

वाटत मला ही कधी कधी की 
माझ्या शरीरावर नाही तर 
माझ्या मनावर कुणीतरी प्रेम करावं 
या मनाला माझ्या अलगद जपावं 
असावं अस ही हक्काचं आपलं कुणीतरी
ज्याच्या मांडीवर डोकं ठेऊन निजाव
हळूच कुशीत घेऊन त्याने मला
अलगद त्याचे ओठ माझ्या कपाळावर टेकवावे
अन् मी डोळे बंद करून त्याला घट्ट मिठी घ्यावं....
वाटत ना मला ही कधी कधी की 
कुणीतरी माझ्या शरीरावर नाही तर
मनावर प्रेम करावं...
माझ्या मनातील भावना 
माझ्या ओठांनी न सांगताच 
त्याने माझ्या डोळ्यातून ओळखाव्या 
अन् माझ्या चेहऱ्यावरचं हास्य
त्या मोगर्या सारखं फुलाव 
अन् त्याच क्षणी 
मन अधीर अधीर व्हावं....
मन अगदी स्थिर होऊन जावं.....


स्पंदनात

तू हवा होतास आयुष्यात 
आजही सोबत माझ्या
खूप जपलं असतं तुला
श्वासातील स्पंदनात माझ्या

जपता जपता तुला
समजावून ही घेतल असतं
फुलासारखं तुला माझ्या
ओंजळीत धरलं असतं


वंदन तुजला शिवराय

या शुभ दिनी वंदन करते
तुजला शिवराया.....
पूर्ण होवो इच्छा आकांक्षा
दूर होवो सर्व काया....

लखलखाट दिव्यांचा
असाच तेवत राहू दे....
अंधार आयुष्यातला
क्षणात जळू दे....

*sapna.....*✍🏻


तुला काय आवडतं

असच गप्पा मारत असताना मला कुणीतरी सहज विचारलेला प्रश्न की तुला काय आवडतं ? 

तर त्या प्रश्नावर असलेलं माझं उत्तर.....
..............................
कुणी रडत असेल तर 
हसवायला आवडतं....
कुणी दुःखात असेल तर 
त्याला सुखाची मोहर 
द्यायला आवडतं....

कुणाच्या डोळ्यात पाऊस असेल 
तर त्या पावसाची 
सर व्हायला आवडतं...
नभ दाटून आलेल्या मनालाही
मला सावरायला आवडतं....

जे मुलं पोटासाठी 
आपला श्वास विकतात 
त्या मुलांच्या पोटाची 
भूक व्हायला आवडतं....
त्यांच्या आयुष्यातील 
सुख व्हायला आवडतं....

असच मला 
त्या गरिबांच्या चेहऱ्यावरचं 
हास्य व्हायला आवडतं....
...........................

निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन 
त्या हिरव्यागार झाडांचं 
रूप व्हायला आवडतं....
नदीच्या किनारी जाऊन 
त्या खडखडत्या पाण्याची 
लाट व्हायला आवडतं.....

त्या नीरव शांततेत मला
सप्तसुरांनी रचलेल गीत 
व्हायला आवडतं....
रात्रीत पडणाऱ्या स्वप्नांची 
प्रीत व्हायला आवडतं.....

त्या आकाशात उडणाऱ्या
पक्षांसारख मला बिनधास्त 
जगायला आवडत....
त्या रंगबिरंगी पाखरासारख 
मला बेधुंद व्हायला आवडतं....

लेखणी हातात घेऊन 
माझ्या लेखणीतून येणारे 
शब्द व्हायला आवडतं.....
त्या कोऱ्या कागदावरील 
निळ्या शाईने लिहिलेली मला
कविता व्हायला आवडतं....


धुके

नभात दाटले आज धुके असे
पानावरती पडले दवबिंदू जसे
पुसट झाल्या चंद्र चांदण्या
हरवून गेले ते शब्द कसे.....

भरले ते नभ गच्चून धुक्यानी
ओसंडून पडती ते ओले धुके
सडे पडून ओस पडला दवबिंदूचा
जणू व्हावे ते ओठातील शब्द मुके


happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...