Monday, December 4, 2023

मन अधीर अधीर व्हावं

वाटत मला ही कधी कधी की 
माझ्या शरीरावर नाही तर 
माझ्या मनावर कुणीतरी प्रेम करावं 
या मनाला माझ्या अलगद जपावं 
असावं अस ही हक्काचं आपलं कुणीतरी
ज्याच्या मांडीवर डोकं ठेऊन निजाव
हळूच कुशीत घेऊन त्याने मला
अलगद त्याचे ओठ माझ्या कपाळावर टेकवावे
अन् मी डोळे बंद करून त्याला घट्ट मिठी घ्यावं....
वाटत ना मला ही कधी कधी की 
कुणीतरी माझ्या शरीरावर नाही तर
मनावर प्रेम करावं...
माझ्या मनातील भावना 
माझ्या ओठांनी न सांगताच 
त्याने माझ्या डोळ्यातून ओळखाव्या 
अन् माझ्या चेहऱ्यावरचं हास्य
त्या मोगर्या सारखं फुलाव 
अन् त्याच क्षणी 
मन अधीर अधीर व्हावं....
मन अगदी स्थिर होऊन जावं.....


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...