Monday, December 18, 2023

आई

आई तुझा स्पर्श होताच 
बाळ थांबवते रडणं
काय जादू ग तुझ्यात
गाऊ लागते ते गाणं.....

मायेची ऊब तू आई
डोक्यावरची ग सावली
पावलागणिक साथ देते
धन्य तूच ग माऊली.....

संस्काराची विचारधारा तू
आई तू करुणेचा सागर 
जन्म देऊनी तू मजला
जीवनास दिला ग आकार...

काळजाच्या गाभाऱ्यात 
रोजच तिच्या असे अंधार
ऊन येते डोईवर 
तरी कष्ट करते अपार...

संसाराचा गाडा ओढता ओढता
नाही हिंमत तुझी ग हरली
बाप माझा होऊनी दिवा
तू वात होऊनी जळली....

sapna patil....✍🏻

No comments:

Post a Comment

खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी