तर त्या प्रश्नावर असलेलं माझं उत्तर.....
..............................
कुणी रडत असेल तर
हसवायला आवडतं....
कुणी दुःखात असेल तर
त्याला सुखाची मोहर
द्यायला आवडतं....
कुणाच्या डोळ्यात पाऊस असेल
तर त्या पावसाची
सर व्हायला आवडतं...
नभ दाटून आलेल्या मनालाही
मला सावरायला आवडतं....
जे मुलं पोटासाठी
आपला श्वास विकतात
त्या मुलांच्या पोटाची
भूक व्हायला आवडतं....
त्यांच्या आयुष्यातील
सुख व्हायला आवडतं....
असच मला
त्या गरिबांच्या चेहऱ्यावरचं
हास्य व्हायला आवडतं....
...........................
निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन
त्या हिरव्यागार झाडांचं
रूप व्हायला आवडतं....
नदीच्या किनारी जाऊन
त्या खडखडत्या पाण्याची
लाट व्हायला आवडतं.....
त्या नीरव शांततेत मला
सप्तसुरांनी रचलेल गीत
व्हायला आवडतं....
रात्रीत पडणाऱ्या स्वप्नांची
प्रीत व्हायला आवडतं.....
त्या आकाशात उडणाऱ्या
पक्षांसारख मला बिनधास्त
जगायला आवडत....
त्या रंगबिरंगी पाखरासारख
मला बेधुंद व्हायला आवडतं....
लेखणी हातात घेऊन
माझ्या लेखणीतून येणारे
शब्द व्हायला आवडतं.....
त्या कोऱ्या कागदावरील
निळ्या शाईने लिहिलेली मला
कविता व्हायला आवडतं....
No comments:
Post a Comment