Tuesday, September 27, 2022

व्यथा मनाची

घेतला कोरा कागद हातात 
कविता मनाची लिहत होती 
कुणीच नसतं कुणाचं 
असं लेखणीला माझ्या सांगत होती 
बंद झाल्या सर्व वाटा 
काय करावे म्हणून 
 विचार मी करत होती 
व्यथा मनाची माझ्या
 शब्दात तिला मांडत होती 
भरून येतो कंठ माझा 
डोळे माझे भरत होती 
रितं करावं कुठ त्यांना 
कवितेला माझ्या सांगत होती 
भीती वाटते एकटेपणाची 
लेखणीने माझ्या गिरवत होती 
कुणास सांगू दुःख मनाचं 
एकटीच माझी रडत होती 
कुणी न यावे अश्रू पुसण्या माझे 
मनाशी माझ्या भांडत होती 
व्यथा मनाची माझ्या 
निळ्या शाईने मिरवत होती.... 
व्यथा मनाची माझ्या 
निळ्या शाईने मिरवत होती....

माणूस असा जगतो आहे

हयात असतो आपण जेव्हा
सोबत कुणी राहत नाही
सरणावर पडतो आपण तेव्हा
गर्दी लोकांची मावत नाही

जगता जगता आयुष्य 
एकटे आपण पडतो आहे
मेल्यावर आपलाच माणूस
कावळ्याला घास टाकतो आहे

कुणा का सांगाव्या
आपल्या मनाच्या व्यथा
सगळे त्यांच्या विश्वात मग्न
आपली होते फक्त एक कथा

आयुष्यभर माझं माझं केलं
अख्खं जग दाहक झालं
सरणावर पडलो मी जेव्हा
सर्व काही मातीत गेलं


Tuesday, September 20, 2022

बेफिकर मन

कितीही लिहिलं मी तुझ्यावर 
तरीही अपूर्णच पडते
का माहित नाही पण मन माझं 
अजूनही तुझ्याचसाठी जळते

राहिलेली ती आपली अपूर्ण भेट
पुन्हा तुझ्या येण्याची वाट बघते
भरून येतात माझे डोळ्यांचे काठ 
आठवण मात्र तुझी मला नेहमीच सलते

किती सांगावं मी त्या डोळ्यांना
तरीही मन माझं अश्रूच गाळते 
भेट आपली अपूर्ण राहिली असताना
ती बेधुंद होऊन श्रावणात बरसते....

✍🏻✍🏻


Monday, September 19, 2022

बेफिकर मन

बेफिकीर मन माझं 
भुरुभरू उडते
बेधुंद तुझ्या मनाला
सैरभैर करते....

बेफिकीर मन माझं 
कसं वाऱ्यावर डुलते
सैल होऊन पाखरासाठी
धुंद होऊन फुलते....

...............✍🏻


बेफिकर मन... हायकू

बेधुंद मन 
करते भिरभिर
चालते स्वैर 

बेधुंद मन 
सुसाट ते सुटते
पक्षी बनते

आवर घाल
बेफिकर मनाला
सावर त्याला

बेधुंद मन
बिफिकर ते उडे
सगळीकडे

✍🏻✍🏻

Monday, September 12, 2022

सांजवेळ ती मिलनाची

त्या सांजवेळी याद तुझी का यावी
ती वेळ तुझ्या नि माझ्या मिलनाची
मी पौर्णिमेच्या रात्रीत स्मरावी...
अबोल डोळे तुझे नि माझे
स्मृतीत घेऊन का सांगावी
तूच आहेस हृदयात माझ्या
हीच साद तुला माझ्या
श्वासातील स्पंदनानी कळावी...
शब्द झाले ते निशब्द माझे
तुलाच बघून मी लाजावी
स्पर्श तुझ्या प्रीतीचा होताच
हळूच मी गालात हसावी.....
ती वेळ तुझ्या नि माझ्या मिलनाची
मी पौर्णिमेच्या रात्रीत स्मरावी.....

.............................................✍🏻


कलाकार

शेवटपर्यंत त्याच नाव 
रोशन करून मेला
तो प्रसिद्ध कलाकार
चार्ली चॅप्लिन होऊन गेला.....

मनातील दुःख वेदना विसरून
चेहऱ्यावर हसू नेहमी तो ठेवायचा
रंगमंचावर आपली कलाकारी करून
अख्ख्या जगाला खळखळून हसवायचा....

✍🏻


पुनर्जन्म

या जन्मी दृष्टीस 
पडती पाप कर्म
मग का घ्यावा 
पुनर्जन्म....

क्षणिक सुख 
भोगती नराधम
मग का घ्यावा मी 
पुनर्जन्म.....

कळी उमलून
क्षणात जासी कोमेजून
मग का येऊ मी
पुन्हा फुलून....

दृष्टीस ही ना पडो
असले हे वाईट कर्म
नको मज देवा हा 
पुनर्जन्म....

..............................✍🏻

प्रेम असाच असावं

प्रेम असावं त्या निखळ वाहणाऱ्या झऱ्यासारखं
प्रेम असावं ते बेधुंद सुटलेल्या वाऱ्यासारख
प्रेम असावं ते किलबिल करणाऱ्या पक्षांसारख
प्रेम असावं ते आकाशातील चमचमणाऱ्या ताऱ्यांसारखं
प्रेम असावं ते बेधुंद होऊन उडणाऱ्या पाखरासारख
प्रेम असाव त्या काट्यांमधे राहून सर्वदूर सुगंध दरवळणाऱ्या  फुलासारखं.....
प्रेम असावं ते मोगऱ्याच्या वेलीलाही सुगंध देण्यासारखं
प्रेम असावं ते श्रावणातल्या रिमझिम पडणाऱ्या पावसासारखं....
प्रेम निस्वार्थ असावं..... गवतावरच्या दवबिंदुला हळूवार छेडण्यासारखं....
मग ते प्रेम स्वतःवर का असेना पण प्रेम असच असावं....  काळजाला भिडण्यासारखं.....

............................................🌊✍🏻✍🏻...


सांजवेळ

त्या सांजवेळी याद तुझी का यावी
ती वेळ तुझ्या नि माझ्या मिलनाची
मी पौर्णिमेच्या रात्रीत स्मरावी...
अबोल डोळे तुझे नि माझे
स्मृतीत घेऊन का सांगावी
तूच आहेस हृदयात माझ्या
हीच साद तुला माझ्या
श्वासातील स्पंदनानी कळावी...
शब्द झाले ते निशब्द माझे
तुलाच बघून मी लाजावी
स्पर्श तुझ्या प्रीतीचा होताच
हळूच मी गालात हसावी.....
ती वेळ तुझ्या नि माझ्या मिलनाची
मी पौर्णिमेच्या रात्रीत स्मरावी.....

.............................................✍🏻


मिलन तुझे नि माझे

यावी ती कातरवेळ 
माझ्याही आयुष्यात 
तुझ्या माझ्या मिलनाची
मी स्वप्नधुंद होऊन 
मला तुझ्यात रंगवण्याची.....
व्हावे तुझे नि माझे मिलन
त्या पौर्णिमेच्या रात्री
गडदून जावी ती रात्र
फक्त तुझ्याच सोबत असण्याची...
तो वादळ वारा ही स्तब्ध व्हावा
व्हावी ती रात्र ही निशब्द 
अन् यावी ती अशी ही वेळ 
फक्त तिथच थांबण्याची
फक्त तिथच थांबण्याची....

........................................✍🏻✍🏻❤️


happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...