Tuesday, June 28, 2022

पाऊस...


आज बेभान होऊन बरसत होता तो
मी फक्त एक टक लावून बघत होते त्याला
काहीतरी सांगावेसे वाटत होते त्याला
पण त्याच्या अशा बरण्यानेच मला
सर्व काही कळत होते तो अबोल असताना
त्याच्या डोळ्यातून त्या वाहणाऱ्या धारा
मला अचंबित करत होत्या
आज तो मला खूप एकवटलेला दिसत होता
कदाचित मला तो माझी साथ मागत असेल
असेच मला जाणवत होते
झाडाच्या आडोशाला उभी होते मी
अन् तो मला त्याच्याकडे येण्याची ओढ लावत होता
का माहित नाही पण मला पण त्याचा सहवास हवाहवासा वाटत होता.....
मला त्याचा होणारा स्पर्श मोहरुन टाकत होता
मी चिंब चिंब भिजत होते
त्याच्या कुशीत बेधुंद होऊन
विजेचा कडकडाट होत होता
मी बेभान होऊन त्याच्यात सामावले
एवढी सामावले की माझे मलाच भान न राहिले
अन् घेऊन गेला तो मला स्वप्नांच्या दुनियेत....

.
.
.
जणू सामावला माझ्यात तो छंद प्रीतीचा....
चौफेर पसरला तो सुगंध प्राजक्ताचा.....
मदमस्त करुनी गेला तो गंध त्या ओल्या मातीचा....
आज बेभान होऊन बरसला तो पाऊस माझ्यावर
अन् होऊन गेला तो माझ्या मनाचा.....


स्वप्नमयी....✍🏻✍🏻

Saturday, June 25, 2022

पावसाची सर

अलगद.....हळुवार येऊन गेली ती....
मी खिडकीत उभी असताना
मनाला हळूच स्पर्शून गेली ती 
मी भानावर नसताना
स्पर्श तिचा होताच..... शहारले मी
रोमारोमांत गंध पसरला
मी चिंब चिंब भिजताना....
बेधुंद होते मी 
गीत तिचे गाताना
तिच्यात हरवून जाते मी
सरी रिमझिम रिमझिम झरतांना....
अलगद....... हळुवार येऊन गेली ती...
पावसाची सर....
मी कविता मनाची लिहिताना.....

स्वप्नमयी......✍🏻✍🏻

Friday, June 24, 2022

स्वप्नपरी...

यावे तिने ही कधी कधी माझ्या स्वप्नात 
माझ्या मनाला शांत करण्यासाठी 
रागवलेच मी कधी तर 
मला समजून घेण्यासाठी
नसेल कुणी माझं जेव्हा
तर यावं तिने ही कधी कधी 
मायेची ऊब देण्यासाठी
एकवटले मी कधी तर 
माझा एकांत दूर करण्यासाठी
खचले मी कधी तर 
याव तिने ही कधी कधी 
माझा आत्मविशवास वाढवण्यासाठी
रडलेच मी कधी तर 
मला हसवण्यासाठी
याव तिने कधी कधी माझ्या स्वप्नात 
स्वप्नपरी होऊन माझ्यासाठी.....

स्वप्नमयी ....✍🏻✍🏻

Sunday, June 12, 2022

तो पाऊस

आज पुन्हा तो पाऊस मला 
आठवांत भिजवून गेला
बरसत होता तो अन्
मंत्रमुग्ध होवून बघत होते मी
माझ्या डोळ्यांच्या पापण्यातून
अलगद तो वाहून गेला....
आज पून्हा तो पाऊस मला
आठवांत भिजवून गेला
खिडकीत उभी होते मी
वाऱ्याची मंद झुळूक 
देऊन मला स्पर्शून गेला
मी भानावर आले
अन् पुन्हा त्यात रमून गेले
आज पुन्हा तो पाऊस मला
आठवात भिजवून गेला
ढगांचा कडकडाट अन्
पावसाची सर अलगद येवुन
माझ्या मनाला चिंब करून गेली
ओली सांजवेळ ती अन्
सोसाट्याच्या वारा
हळुवार चालणारी नौका
अन् समुद्रकिनारा 
माझ्याच मनाला सांगड घालून गेला ...
आज पुन्हा तो पाऊस मला
आठवांत भिजवून गेला


स्वप्नमयी.....✍🏻✍🏻


Saturday, June 11, 2022

धडपडणारं स्वप्न मी

धडपळणारं स्वप्न मी
वाटेवरचा प्रकाश आहे
प्रकाशाची वाट मी
उत्तुंगणारा ध्यास आहे.....
निसर्गाशी नातं माझं
झुळझुळणारं पाणी आहे
रिमझीम नारा पाऊस मी
सळसळणारी सर आहे.....
धडपळणार स्वप्न मी
वाटेवरचा प्रकाश आहे....
गुणगुणनार  गित मी
गीताचे मी बोल आहे
गुंफण आहे शब्दांची मी
सुरांची मी चाल आहे....
अविरत झुलणारी वेल मी
समुद्रावरची लाट आहे
सागराशी नातं माझं
पाण्याचा मी थेंब आहे....
माणुसकीची गाठ मी
गरिबीची मला जाण आहे
वाऱ्यावरच झुळूक मी 
स्पंदनातील श्वास आहे...
कवितेतील शब्द मी
निळ्या शाईची लेखणी आहे
अविरत चालते लेखणी माझी
त्यातलीच मी कविता आहे....
धडपळणारं स्वप्न मी
वाटेवरचा प्रकाश आहे
वाटेवरचा प्रकाश आहे.....

sapna patil... ✍🏻✍🏻✍🏻

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...