Sunday, June 12, 2022

तो पाऊस

आज पुन्हा तो पाऊस मला 
आठवांत भिजवून गेला
बरसत होता तो अन्
मंत्रमुग्ध होवून बघत होते मी
माझ्या डोळ्यांच्या पापण्यातून
अलगद तो वाहून गेला....
आज पून्हा तो पाऊस मला
आठवांत भिजवून गेला
खिडकीत उभी होते मी
वाऱ्याची मंद झुळूक 
देऊन मला स्पर्शून गेला
मी भानावर आले
अन् पुन्हा त्यात रमून गेले
आज पुन्हा तो पाऊस मला
आठवात भिजवून गेला
ढगांचा कडकडाट अन्
पावसाची सर अलगद येवुन
माझ्या मनाला चिंब करून गेली
ओली सांजवेळ ती अन्
सोसाट्याच्या वारा
हळुवार चालणारी नौका
अन् समुद्रकिनारा 
माझ्याच मनाला सांगड घालून गेला ...
आज पुन्हा तो पाऊस मला
आठवांत भिजवून गेला


स्वप्नमयी.....✍🏻✍🏻


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...