Tuesday, October 5, 2021

विरह

 आयुष्याचा खेळ पण हा कसा चालतो 

प्रीत वेड दोन पक्षी कसे एकत्र येतात 

आणि एकमेकांपासून दूर होऊन जातात


चांद रात्री येतात तुझ्या आठवणी

मंथरतो रान वारा छळतोस मनी


नभात एकटा हा चंद्र तो झुरतो

स्वप्नमयी रात्री तूच गाहिवरतो


रोज रात्री होतो तुझाच स्वप्न भास

तुझ्या प्रीत भेटीची लागते रे आस


वैर डाव कुणी हा साधला

ताटातूट करुनी डाव हा घातला


नभा तील तारे पहाटेचे वारेे फुलून येतात

प्रीत वेड दोन पक्षी दूर होऊन जातात


विरहाच्या वणव्याने घायाळ केले

चांदण्याचे मन माझे जळून गेले


नको हा विरह नको हा दुरावा 

खऱ्या आपल्या प्रेमाचा कसला रे पुरावा


Sapna patil....✍️✍️



No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...