ठाव तू माझ्या मनाचा घेतो
गुंता हा भावनांचा गुंतत जातो
कधी म्हटलं द्यावं सोडून हे सर्व
जीव मात्र तुझ्यात अजुनच हरवून जातो
काय करावं या मनाचं काहीच कळेना
मनातील भावनांचा गुंता वाढल्याविना राहेना
कधी म्हटलं नाही गुंतायच तुझ्यात पण
हा जीव मात्र तुझ्यात गुंतल्याविना रहेना
ठाव कळतात तुझ्या मनातील सारे
पण दाखवत नाही मी कधी तुला
मी तर सांगून देईल लगेच तुझ्या मनातल
पण तुझ्याच तोंडून ऐकायचं असते मला...
गुंता हा भवनांचा अजुनच वाढत जातो तर
मग सांग कस सोडू मी तुला......
Sapna patil....✍️
No comments:
Post a Comment