असा कसा एकटा निघून गेलास
जे राहिले तिला तू सोडून गेलास
एकदा ही मागे वळुन नाही पाहिले
पण आठवणींना मात्र मागे ठेवून गेलास
एकदा ही नाही भरले तुझे डोळ्यांचे काठ
पण त्या तुझ्या डोळ्यातील अश्रूंना
ही तू मागे सोडून गेलास
एकदाही मागे वळून नाही पाहिले तू
पण माझ्या डोळ्यांचे काठ तू भरून गेलास
तू तर निघून गेलास बिनधास्त मनाने
पण या स्वार्थी दुनियेत मला एकटीला तू सोडून गेलास
या माझ्या जीवाला वेड तुझ लावून गेलास....
Sapna patil....✍️
No comments:
Post a Comment