काय म्हणावं या हातावरील रेषा ना.... माझं नशीब की मी केलेली चूक.... की मी जन्म घेतला ही चूक.... काय म्हणावं मी या वेगळ्याच मार्गाने जाणाऱ्या रेषांना....
कळत नाहीय मी कोणत्या रस्त्याने चालावे तर.... कुठे तरी रस्त्या चुकल्यासारखं वाटतयं. खरं तर आयुष्यच जगवस वाटत नाहीय... जेव्हा तेव्हा डोळ्यात सुनामी... चेहऱ्यावर तर खूप शांतता पण मनात खूप मोठं न थांबणार वादळ... काय करावं कुणाशी कस बोलावं काहीच सुचत नाहीय...
कुणी यावं मनाला समजवाव अस तर कुणी राहीलच नाहीय... पण समजवून तरी काय फायदा समजवणाऱ्याला पण वाईट बोलण तर कुणी कस समजवेल. आधी तर या माझ्या हाताच्या रेषा अगदी सरळ होत्या मग अशा अचानक.... काय झालं असेल त्यांना... का बदलाव लागलं त्यांना....चुकीच्या मार्गाने, चुकीच्या विचारांचा अवलंब का करत आहेत... एवढे बदल कसे होऊ शकतात... कधी कुणा बद्दल वाईट विचार केला नाही आणि आज काय झालं मला... मी आज एवढी स्वार्थ कशी होऊ शकते. एवढं बदल होणे अशक्य आहे. दुसऱ्यातील सुख बघणारी मुलगी आज एवढी स्वार्थी कशी होऊ शकते. की आधी पण माझ्यात हा स्वार्थ होताच... नाही... पण तो स्वार्थ फक्त दुसऱ्याचे सुख पाहण्याचा होता...पण आज जो स्वार्थ आहे तो वेगळाच आहे . काय कारण आहे या पाठीमागचा... या साध्या भोळ्या मनाला कुणी घेरलेल असावं... नाही कळतय काहीच... जगाव की मरावं हे दोनच प्रश्न समोर दिसत आहेत. जगले तर हा स्वार्थ स्वाभिमानाने जगू देणार नाही.... आणि मेले तर आयुष्याला घाबरून पळ काढली अस होईल. जगता पण येत नाहीय आणि मरता पण येत नाहीय. काय करावं काहीच सुचत नाहीय. कुणाला सांगू या मनातील विचारांना...😥😥 दुसऱ्यांच्या डोळ्यातील सुख यातच मला आनंद होता आणि त्याच्यामुळेच ते बघता आलं मला आणि आज मी एका शब्दाने माझी जात दाखवून दिली त्याला. Opetion च उरलेलं नाहीय या जगण्याला... आयुष्यात समजून घेणारं पण कुणीच राहिलेलं नाहीय... कारण चूक मीच केलेली आहे. माझ्याच चुकीच्या बोलण्यामुळे मी आज एकटी पडलीय. माझ्याच चुकीची शिक्षा मी आज भोगत आहे.... माहीत नाही मी उद्या असेल की नसेल.कारण रात्र पण काढणे खूप अवघड झाले आहे....
Sapna patil ✍️📝
अतिशय हृदयस्पर्शी लेखन केले सखी ✍️🌟👌👌
ReplyDeleteThanks 🙏
ReplyDeleteखूप हृद्य...पण जातांना प्रत्येकाने संयम ठेवणे आवश्यक...!✍️👌👌👌
ReplyDeleteChaan
ReplyDelete