नको करू ग बाई तू धावपळ.....
संध्याकाळी आल्यावर तो
करेल ग तुझा छळ.....
दारूच्या नशेत केला त्याने
काल खूप मोठा गुन्हा.....
आज तुझ्यावर ही तोच
करेल ग बलात्कार पुन्हा.....
झाला आहे तो व्यसनाधीन.....
करेल ग बाई तो तुझा संसार उद्ध्वस्त
दारूच्या आहारी जाऊन.....
करेल तुझच आयुष्य फस्त.....
अरे करा रे तुम्ही निदान
येणाऱ्या पिढीचा तरी विचार....
नका होऊ तुम्ही व्यसनाधीन
तुमच्याच मुलांवर होईल अत्याचार....
नका लावू हो आयुष्याची वाट....
होईल रे तुमच्याच शरीराचा ऱ्हास....
तुम्ही स्मशानात गेल्यावर....
नाही मिळणार तुमच्याच मुलांना अन्नाचा घास.....
Sapna patil.....✍📝
No comments:
Post a Comment