Tuesday, October 5, 2021

मी शेतकरी बोलतोय



किती सत्व घेशील रे निसर्गा 

काय मिळते रे घेऊन 

तुला आमची मजा

उन्हा तन्हात राबराब 

राबतो य माझा शेतकरी राजा....

तोंडी आलेला घास तू 

हिरावून नको घेऊस 

कशाला पडतो रे तू 

भलत्या वेळेस पाऊस.....

अख्ख्या जागाच पोट मी भरतोय 

या इवल्याश्या अंकुराने 

नको त्याच पुढचं ताट तू ओढुस 

भलत्या वेळच्या पावसाने.....

मीच नसला तर हे

जग काय खाईल 

त्यांना नाही मिळालं अन्न 

तर हे जग मरून जाईल.....

खूप मोठ्ठं कर्ज आहे रे 

माझ्या डोक्यावर

मुलाबाळांची स्वप्न पूर्ण करण्याचं 

ओझ आहे माझ्या खांद्यावर.....

बीजाचे अंकुर करतो 

अंकुरााचे फुल बनवतो

फुलाचे फळ मी करतो

आणि तोंडाशी आलेला 

घास माझा तू का रे ओढतो....

हे निसर्गा नको रे घेऊ 

माझी ही सत्वपरीक्षा

मी उगवलेल्या अंकुरच 

पीक येऊ दे हीच होती रे 

तुझ्याकडून अपेक्षा....

नको आणू ती माझ्यावर 

आत्महत्येची पाळी

एवढं मोठ्ठं कर्जाच ओझ 

नको लिहू माझ्या भाळी....

होऊ दे मला कर्जमुक्त

दे तू माझ्या पिकाला भाव

तेव्हाच पडेल माझ्या 

लेकरांवर छाव...

काळया मातीत सोन मीच उगवतो 

अख्ख्या जगाचं पोट मीच भरतो

आणि फाटलेली गंजी सुद्धा मीच घालतो

मग तू मलाच का हा दिवस दाखवतो....

सांग निसर्ग सांग 

आज मी तुला प्रश्न विचारतोय 

हे नालायक सरकार आज

मलाच का फसवतोय.....

Sapna patil....


विसरून भान सारे


 

विसरून भान सारे 

मी तुझ्यात गुंतले

तुझ्या डोळ्यातील तेज 

पाहून भान माझे हरले....

तुझ्या नजरेला 

नजर भिडताच

मी माझेच न राहिले.....

तुझ्या त्या नशिली डोळ्यांनी 

भान माझे हरपले.....

तुझ्या एका शब्दाला 

मी ऐकताच 

मन माझे तुझ्यात 

हरवून गेले....

तुझ्या त्या गोड 

शब्दाने मनाला 

स्पर्श होताच भान 

माझे हरवून गेले....

विसरून भान माझे 

सारे मी तुझ्यात गुंतले....

Sapna patil....✍️✍️✍️



असे हे मला काय होते



असे हे मला काय होते...🤔

तू माझ्याशी बोलायला लागला....😘

की मी hang पडून जाते....🤩

असे हे मला काय होते....🤔


असे हे मला काय होते...

तू स्वप्नात जरी आलास माझ्या 

तरी माझं हृदय धडधडू लागते...

कळत नाही रे 

हे असे मला काय होते....


असे हे मला काय होते 

तुझ नाव जरी ऐकल ना 

तर माझा आनंद गगनात

मावेनासा होतो....

कळत नाही रे 

असे हे मला काय होते....


असे हे मला काय होते 

नुसत्या तुझ्या विचाराने 

मन माझे डोलायला लागते

असे हे मला काय होते.....


तू एक दिवस जरी माझ्याशी 

बोलला नाही ना तर मन माझं 

कावराबावरा होऊन जाते

कळत नाही रे 

हे असं मला काय होते....


तुझ्या सकाळच्या एका msg 

ने माझा दिवस पूर्ण होऊन जातो

कळत नाही रे मला... तूच सांग ना...

असे हे मला काय होते...


Sapna patil....✍✍✍✍✍



सांगायचं नव्हतं तुला

 सांगायचं नव्हत तुला... पण

तुला संगल्याविना राहवेना....

सगळ्यांसोबत असूनही 

एकटी आहे तुझ्याविना...


सांगायचं नव्हत तुला....पण 

मनातल गुपित सांगुनच टाकते...

तुझे पाणीदार डोळे आहेत ना

ज्यात बघितलं की सगळ काही

थांबल्यासारख वाटते...


सांगायचं नव्हत तुला...काही

पण तुला सांगावस वाटलं...

तुझ्या निरागस हसण्यानेच 

मला दुःखात हसायला शिकवलं....


सांगायचं नव्हत तुला....

प्रेम केलं मी तुझ्या 

त्या आठवणींवर...

ज्या आजही स्वप्न होऊन 

आहेत माझ्या मनावर....


Sapna patil....✍️✍️✍️



धुंद हा गारवा

              


             धुंद हा गारवा....

             मनी माझ्या भावला

             सायंकाळ झाली असता

             नभात विरघळला...

             चांद रात्रीला तू 

             स्पर्श करून गेला

             तुझ्या स्पर्शाने चांद 

             रात्रीत ही मोगरा फुलला...

             धुंद हा गारवा...

             मज बेधुंद करुनी गेला....

             साज ह्यो तुझा 

             घायाळ मज करुनी गेला...

             मज वेड लावुनी गेला  

             धुंद हा गारवा....

             तुझ्यात हरवून सांजवेळी

             खेळ स्वप्नांचा पहावा....

             ओढ तुझी लावी या जीवा

             धुंद हा गारवा....

             चंद्राच्या शितलतेत मला 

             निरखून पहावा.....


                                Sapna patil ✍️✍️✍️



चांदण्यात फिरताना

 


तू ही शांत मी निवांत

शांत आहेत त्या चांदण्या

भाव माझे बोलले

हर्ष मनी खूप झाला

मन मिलन होताना

वेचल्या मी कविता

चांदण्यात फिरताना....

चंद्र तारे,नभ आणि

सोबत ती थंडगार हवा 

अंगाला झोंबून गेले

या गारव्यात मी 

स्वप्नात बुडून गेले

गालातच हसू फुलले

स्वप्नभंग ही होताना

वेचल्या मी कविता 

चांदण्यात फिरताना....

स्वप्न एक मी पाहिले 

तू सोबत असताना

नकळत तू वेढलास 

नजरा नजर होताना

वेचल्या मी कविता 

चांदण्यात फिरताना....


Sapna patil.....✍️✍️✍️✍️



या बेभान क्षणी


 या क्षणी बेभान होऊनी 

मी माझी न राहिले

मदमस्त होऊन तुझ्यात 

मी सामावून गेले....


या गोड क्षणापेक्षा

आणखी सुख कोणते असावे 

या बेभान क्षणी मी

स्वतःला हरवून बसावे....


या बेभान क्षणी मी 

स्वतःला तुझ्यात गुंतवले....

नात अस जोडले मी तुझ्याशी 

की माझे मी मलाच हरवले....


Sapna patil....✍️✍️✍️



खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी