रांधे मही माय
बाप व्हये तव्हा दिवा
भाकर कष्टाचीच खाय
पोरासाठी मह्या बाप
फाटकी गंजी बी घालतो
शिक्षणासाठी तो मह्या
त्याच्या पोटाले जाळतो
नाय नये कपडे त्याले
ना दिवाई दसरा
फाटक्या झोपडी शिवाय त्याले
नाही कोणाचा आसरा
फाटकी झोपडी त्याची
काय आलं माय नशिबी
पदरी पडली त्याच्या
जन्मभर ती गरिबी
मले छातीशी लावून
मह्या बाप ढसा ढसा रडे
त्याले रडता रडता पाहून
मह्या काळजाले भोकं पडे
काय सांगू लेका
खोट्या कर्माची व्यथा
इथ महीच हून बसलीय
दुभंगलेल्या नशीबाची कथा