तव्हा काळीज मह्य फाटलं व्हतं....
भुकेल व्हतं लेकरू मह्य
तेव्हा ते कुशीत मह्या निजल व्हतं
पडत व्हते माह्या डोयातले आसू
तेव्हा बांध माह्या फुटला व्हता
माह्या काळजाची भोक पाहून
तो एकटाच रडत बसला व्हता
एका येळची भाकर बी
जव्हा भेटत नाय खायाले
घाम गाळून गाळून माय
चटका लागतो व पायाले
उन्हातान्हात भटकतो माय
अन फिरतो अनवाणी
चटके लागिस काळजाले
जिवाचं व्हते पाणी पाणी
पोरीचं लगीन करीन
व्हतं सपान मी पाहिल
कसं सांगू माय तुले
संबध मनातच राहिलं
मोठा साहेब करीन पोरा तूले
पोराले सांगून ठेवलं व्हतं
पण आता कसं सांगू त्याले
की तुझ्या बापाचं रांघत बी
त्या दुष्काळात वायल व्हतं
व्हत्याच नव्हतं झालं
मुठभर धान्य घरात आलं
पण काय सांगू हो तुम्हाला
तिथं बी सरकार आडव आल...
दोन पैक भेटिन म्हणून
धन्य मार्केट ला नेलं
नव्हता भाव माह्या सोण्याले
संबंध काही मातीमोल झालं....
एवढीच विनंती आहे सरकारला
की सरकार मायबाप
करू नका हो माझ्या
बळीराजा वर अत्याचार
नको त्याला गाडी
नको त्याला बंगला
पण पोटभर भाकर
त्याच्या कष्टाची
मिळू द्या सरकार
तुम्ही मिळू द्या सरकार