लेक लाडाची ग बाई
परदेशी जाऊनी
वाट माहेरची पाही....
सुन्या सुन्या दिस....
माहेरच्या वाटा
बांधल्या बाई माझ्या
दूरदेशी गाठा....
आला दिवाळीचा सन
वाट भाऊची ग पाहे....
येईल बंधुराया
आशा मनातच राहे...
आलं डोळं ग भरून
ओली पापणी ग झाली.....
वाट पाहता पाहता
फक्त हुंदके उरली....
✍🏻
No comments:
Post a Comment