Friday, August 26, 2022

शिकवण बुद्धांची

मार्ग शांतीचा
बुद्धांनी आम्हा दिला
धर्म दाखविला 
मानवतेचा....

संयम असावा अंगी
गर्व नका करू जाती धर्माचा
नियम पाळा 
शांततेचा....

समाज प्रबोधन 
बुद्धांनी केल
बोध शिकविला त्यांनी
अध्यात्माचा....

सर्वस्व त्यागिले
शोध लावला जिविताचा
ज्ञानबोध घडला 
अंतरीचा....


लेखकाचे जीवन

काळजातील शब्द ओठांवर येतात
आणि ते कोऱ्या कागदावर उतरतात
मनातील भावना निर्धास्तपणे व्यक्त होतात
आणि शब्द शब्द जुळवून क्षणात कविता तयार होतात
शब्दाशब्दांची रचना करून शब्दांना कवितेचा स्वरूप प्राप्त होते हे फक्त लेखकांच्या लेखणीतून.....
कधी वास्तवातून तर कधी कल्पकतेतून....
कधी प्रेमातून तर कधी भावनेतून....
कधी सुखातून तर कधी दुःखातून....
तर कधी आठवणीतून....
कधी स्वतःवरच लिहावं आणि मन मोकळं व्हावं....
मन हलकं करावं ते फक्त आपल्या लेखनातून....
असच काहीसे असतात लेखकांच्या जीवनातील काही क्षण.... 

लेक लाळाची

दूर देली परदेशी 
लेक लाडाची ग बाई
परदेशी जाऊनी 
वाट माहेरची पाही....
सुन्या सुन्या दिस.... 
माहेरच्या वाटा
बांधल्या बाई माझ्या 
दूरदेशी गाठा....
आला दिवाळीचा सन 
वाट भाऊची ग पाहे....
येईल बंधुराया
आशा मनातच राहे...
आलं डोळं ग भरून
ओली पापणी ग झाली.....
वाट पाहता पाहता
फक्त हुंदके उरली....

✍🏻


बॅरिस्टर

परदेशी जाऊन 
बॅरिस्टर झाले
मायदेशी येऊन 
सविधान लिहिले
त्या महामानवाने.....

गुलाम बनून जगत होते
ते दलित बांधव...
धार बनुनी आले 
ते महामानव....
गुलामीची लक्तरे तोडून
स्वतंत्र दिले मिळवून
त्या बाबासाहेबाने...
मायदेशी येऊन 
संविधान लिहिले 
त्या महामानवाने....

✍🏻

न्यायालय...

कित्येक वर्षांच्या फाईली
पडल्यात न्यायालयात डांबून.....
बिनधास्त मोकळे फिरताहेत खूनी
मंत्र्याचे तोंड दाबून....

न्यायालयात
जे होतील बंदिस्त
होतील फस्त

गुन्हेगारांना
शिक्षा इथे मिळते
जाण कळते


happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...