Thursday, May 26, 2022

भेट दिलेली घड्याळ

ती त्याची खूप वेळ पासून वाट बघत होती. पण तो तिच्यासाठी काहीतरी घेण्यात व्यस्त होता. ती त्याची वाट बघून कंटाळली होती . अचानक तो तिच्यासमोर येऊन जोराने श्वास घेत हातात भेटवस्तू घेऊन एका गुडघ्यावर खाली बसला. आणि बोलायला लागला प्रिये ही भेटवस्तू म्हणून आणलेली घड्याळ आपल्या प्रेमाचं प्रतीक आहे.याचा तू स्वीकार कर. आणि याला सांभाळून ठेव. याला कधीच हरवू देऊ नकोस.ते बघून तिच्या डोळ्यात पाणी येते. आणि ती त्याला घट्ट मिठी मारते. तेवढ्यात मंद अशी वाऱ्याशी झुळूक तिला स्पर्शून जाते. आणि खिडकीत उभी असलेली ती भानावर येते.समोर कुणीच नसतं.त्याने तिला भेट दिलेलं घड्याळ आठवतं. आणि तिच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा वाहायला लागतात.शेवटी तिला स्वतःला सवरल्याशिवाय काहीच मार्ग नसतो.ती शांत होते. कारण तो आता तिच्या आयुष्यातून निघून गेलेला असतो.

स्वप्नमयी...✍🏻✍🏻


No comments:

Post a Comment

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...