एका ट्रक accident मध्ये तिच्या बाबांचा मृत्यू झाला. आणि संपूर्ण परिवार रस्त्यावर आला.घरात चार भावंडं आणि तिची आई. सर्व भार एकट्या आईवर पडला.भावंडाना सांभाळण्यासाठी तिला दहावितच शाळा सोडावी लागली.ती पण सोळा वर्षाची होती.वयात आलेली होती.दिसायला सुंदर ,भरीव छाती,लांब सरळ केस होते तिचे. एकट्या आईच्या रोजंदारी ने सर्वांचं पोट भरणं मुश्किल होत होतं.ती कामाच्या शोधत बाहेर पडली.पण तिला काम कुठच मिळत नव्हतं.जिथं जायची तिथं लोक तिला वासनेच्या नजरेने बघायचे.तिच्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता. तिच्या घराशेजारील एका बाईला सर्व सांगितले.त्या बाईने तिला वैश्या बाजारात जाण्यास उत्साहित केले. कारण ती दिसायला पण खूप सुंदर होती. पण तीच मन तिला कुठेतरी तिथं जायला नाही म्हणत नव्हतं. पण तिच्याकडे कोणताच पर्याय नव्हता. त्या शेजारील बाईने तिला त्या वैश्याखाण्यात नेऊन सोडले. आणि तिथं ते कोवळ फुल वैश्याबजारात विकलं गेलं. तिची पहिलीच वेळ होती. तिला अवघडल्यासारखं वाटत होतं. पण हळूहळू तिला तिथली सवय होऊन गेली.
भावंडांच्या आणि स्वतःच्या पोटासाठी तिला हा पर्याय निवडावा लागला होता.जीवनाला त्रासलेली ती आज वैश्येच्या बाजारात विकली गेली होती.
स्वप्नमयी.....✍🏻✍🏻✍🏻
No comments:
Post a Comment