तीच वेदना मलाही आहे..
किती सहन करतेस,
त्याची जाणीव मलाही आहे...
दिसत नाही वेदना
जग फक्त हसणार आहे..
आपण बनवू आपलं जग
जिथे तू अन मी असणार आहे...
वाहणाऱ्या आसवांना
अलगद ओठांनी टिपायचं आहे,
तुला मिठीत घेऊन
स्वतः पेक्षा जास्त जपायचं आहे...
प्रेम जितकं करतेस,
त्याहून मी जास्तच करेन,
स्पर्शाची भूक नाही मला
तुझ्या डोळ्यात स्वतःला बघेन...
विश्वास ठेवलास माझ्यावर,
तोच माझ्यासाठी अमुल्य आहे,
तुझ्या सोबत जगणं नसेल तर,
तुझ्या सोबत मरणं कबूल आहे....
..
No comments:
Post a Comment