Thursday, December 30, 2021

सुर्य मावळताना


खूप आतुरलेल असते सख्या 
माझं मन तुझ्या भेटीसाठी 
तो सूर्य मावळतीला असताना
मदमस्त होऊन जाते मी त्याच्यात
तुझ्या आठवणीत रमताना.....
डोळेही माझे पानावतात
तुला क्षितिजात शोधताना
तेव्हा भास होतो मज तुझा
तो थंड गारवा अंगाला झोंबताना
तेव्हा स्वतःस हरवून जाते मी 
तो सुर्य मावळतीला असताना....
स्वप्नकवी....✍🏻✍🏻🌾🌱




देवा तुझ्या भक्तीत....

झाले मी तल्लीन देवा तुझ्या भजनात
विठू माझा दिसे मज हरी कीर्तनात

विटेवरी उभा तू.... पंढरीचा पांडुरंग
तुझ्या भक्तीत देवा भक्त होती रे दंग....

तुझ्या भेटीची देवा लागते रे आस
येवो वर्षात पुन्हा पुन्हा तो आषाढी मास.....

स्वप्नकवी....✍🏻✍🏻✍🏻



चहा...

सकाळ सकाळी घेऊनी चहा 
एकच घोटात कशी पिते मी पाहा...🍵
चहा असावा आलं आणि तुळशीच्या पानांचा
सकाळ सकाळी आनंद घ्यावा 
चहा पिताना गोड क्षणांचा...☕
चहा असावा तर अश्व गंधाचा...
संपूर्ण दिवस जातो लाख मोलाचा...🫖

स्वप्नकवी....✍🏻✍🏻✍🏻🌾🌱

31St डिसेंबर ची एक जीवघेणी रात्र...

आज 31डिसेंबर वर्षाचा शेवटचा दिवस....
एका गरीब कुठुंबतील आई आपल्या मुलाला सकाळीच बोलते. बाळा आज कुठ बाहेर जाऊ नकोस रे. हे दिवस चांगले नाही बाळा. त्यावर मुलगा म्हणतो अगं आई काही नाही होत. आज माझ्या मित्रांनी पार्टी दिलीय. सर्व जाणार आहेत आणि मी काय एकटा घरी राहू का. जाऊ दे ग आई मला . सर्व खर्च तर तेच करणार आहेत. आई बोलते तरीपण नको जाऊस बाळा. पार्टी मध्ये मुलं दारू पितात. दंगा करतात .मुलींना छेडतात. नको जाऊस रे माझ्या सोन्या. पण मुलगा काही ऐकायला तयार नसतो. आई मी जाणार म्हणजे जाणार. त्यावर आईला नाइलाज असतो .आई नाइलाजाने हो बोलते. हो जा पण पिऊ नकोस . मुलगा बोलतो नाही आई मी पिणार नाही. बरं जा मग. 
पार्टी झाली .संध्याकाळी क्लब मधून बाहेर आले. आणि घराच्या रस्त्याने सर्वजण निघाले.आणि रस्त्यात झालेला अपघात....
आई ये आई मी प्यायलो नव्हतो ग आई...
माझे मित्र मला खूप फोर्स करत होते प्यायला 
पण मी नाही प्यायलो ना ग तू तरी समजून घे मला 
मी तुला दिलेला शब्द खूप काटेकोर पणे पाळला ग 
मी नाही प्यायलो दारू....😢😢😢
आज मी मरणाच्या दारात उभा आहे तो फक्त माझ्या मित्रांनी ग . आम्ही बाहेर निघालो असता. माझे मित्र त्यांच्या गाडीत बसले आणि मी माझ्या गाडीवर बसलो. पण ते सगळे खूप प्यायले होते . आणि दारू पिऊन गाडी चालवत होते . मी निघालो आणि ते पण निघाले. माझी गाडी पुढे होती . आणि त्यांची गाडी खूप वेगाने माझ्या गाडीच्या मागे धावत आली आणि माझ्या गाडीला धडाड दिश्या ठोकली ग आणि मी तिथेच बेशुद्ध अवस्थेत पडलो. माझं पूर्ण शरीर रक्तबंबाळ झालं होत ग . माझ्या जवळून खूप गाड्या जात होत्या पण मला कुणीच उचलून हॉस्पिटल ल नेलं नाही. काही लोक मी मरताना ची गमत बघत होते . माझे व्हिडिओ बनवत होते. फोटो काढत होते. पण कुणालाच माझी दया आली नाही . माझ्या शरीरातून रक्ताचा पुर वाहत होता. पण मला कुणीच उचललं नाही. या जगात माणुसकी नाही ग आई माणूसकी नाही. मी तर प्यायलो पण नव्हतो ना ग मग मलाच ही शिक्षा का मिळाली. सांग ना आई सांग ना ग. तू तरी विश्वास ठेव ग माझ्यावर. मी खरच तुझी शपथ घेऊन सांगतो आई मी प्यायलो. तू तरी विश्वास ठेव ग माझ्यावर. 😢😢😢
त्या रात्री असं काय झालं 
त्या रात्रीने माझं जीवन ओढून नेलं
नाही प्यायलो मी दारू 
नाही केली मी नशा
मग का मलाच मिळाली 
ही मरणाची शिक्षा
तुझ्या शब्दाबाहेर 
नाही गेलो ग मी आई
मग या मरणाने मलाच 
का ग केली न्यायाची घाई....
हे देवा या जगात तुला पाठवायचे असेल ना कुणाला तर त्या माणुसकीला पाठव. आज ती अस्ती तर मी आज जिवंत असतो . आज मी जगत असतो . त्या आई कुशीत झोपत असतो. माझ्या त्या आईचा हात घरून मला चालायचं होतं रे. माझी नाही निदान त्या माझ्या आई माऊलीची तरी दया येऊ द्यायची होती ना रे. 😢😢😢
स्वप्नकवी.....✍🏻✍🏻🌱🌾🌊




Wednesday, December 29, 2021

व्यभिचार


रोजच होत आहे तिच्यावर अत्याचार
प्रत्येक क्षणी मांडला जातोय 
तिच्या स्वप्नांचा बाजार....
किती सहन करावा तिने हा व्याभिचार....
कधी मिटणार का हा व्याभिचाराचा आजार...
क्षण भंगुर जीवन तिचे 
तरीही घाव सारे सोसत आहे
तिच्या सुखाला दुःखात ती भोगत आहे
वेड्या परीस ती जीवन जगत आहे 
फक्त दुसऱ्यांचे एश्वर्य ती पाहत आहे....
धगधगीत जीवन तिचे 
आनंदाने जगत आहे....
पण कधी कुणी जाणून घेईल का 
तिच्या दुभंगलेल्या मनाला
कधी कुणी करेल का नाहीसा या व्याभिचारला.....
 स्वप्नकवी....✍🏻✍🏻🌱🌾

Saturday, December 18, 2021

गुरू....



आज दत्त जयंती या निमित्ताने सर्वांना दत्त जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा....🙏💐

गुरू ज्ञानाचा सागर
गुरू भक्तीचा आगर
गुरू जीवनाचा आधार
कृपावंत....

गुरुविणा जीवन व्यर्थ
गुरु असूनी देह सार्थ
गुरू मनाचा कल्लोळ
कीर्तिवंत

गुरू इश्र्वररुपी दास
गुरू बुद्धीचा विकास
असे उदात्त अंतःकरण
गुरुंचीया दासा

स्वप्नकवी...✍🏻✍🏻🌱

Friday, December 17, 2021

भान न राहिले कुणाचे


स्वतःस हरवून तुला 
स्वप्नात मी पाहिले....
गुंतलो असा तुझ्यात मी 
मला भान न कुणाचे राहिले....

स्वप्नकवी.....✍🏻✍🏻🌱🪴

शायरी....थोडी प्यार वाली

अर्ज किया है
सूनो....
 
तुम मेरे पास से जाती रोज हो
तुम मेरे पास से जाती रोज हो....
लेकीन क्या करू घरपे जाने के बाद भी तुम याद आती रोज हो...

✍🏻✍🏻 स्वप्नकवी...✍🏻✍🏻✍🏻
wah wah wah wah kya bat hai...🤣🤣😃😃😃😜

मानवता



मिटवू हा जातीयवाद
सर्व वादाना सामोरे जाऊ
देशाच्या या भल्यासाठी
मानवता हा धर्म जागवू

एकजुटीची मशाल पेटवू
धर्म अधर्माचे युद्ध संपवू
युध्दाच्या गर्दीत नीतीचा झेंडा रोवू....
चला मानवता हा धर्म जागवू....

बलात्काराचे किस्से आजच मिटवू
नव्या या दुनियेतील अमानुषता घालवू
एकजुटीने मिटवू हा भ्रष्टाचार
गोर गरिबांना हक्क त्यांचा देऊ...
चला मानवता हा धर्म जागवू...

बुद्ध रुपी जगाचे विचार घडवू....
दानव रुपी जगातील हिंसाचार मिटवू
येणाऱ्या पिढीचे भविष्य वाचवू
पुन्हा नव्याने स्वप्न रंगवू......
चला मंव्याव्हा धर्म जागवू....


स्वप्नकवी....🌱🪴✍🏻✍🏻✍🏻

Wednesday, December 15, 2021

indian fouji....🇮🇪🇮🇪

देशासाठी लढेल देशासाठी मरेल
लहानपणापासूनच मनात हौस होती
लढता लढता देश जिंकेल 
हीच मनात लागलेली आस होती....
जबाबदारी घेईल हातात 
देश सांभाळण्याची
शत्रूंच्या तावडीतून देशाला वाचवेल 
हीच मनात इच्छा होती....

फौजी म्हणून निवड झाली
सीमेवर जायची वेळ आली
देशाच्या रक्षणासाठी
गाव सोडायची घाई झाली
जाता जाता आई म्हणाली
जय जिजाऊ जय शिवराय
मनात जिद्दीची आस पेटली
पण काळीज शेवटी मायच होत
डोळ्यातून धारा वाहू लागल्या
बाप माझा शेतकरी 
बेटा लवकर परत ये घरी 
म्हणून....
मान खाली घालून 
डोक्यावरून हात फिरवू लागला
पखानाची छाती असलेला माझा बाप
आज धसा धसा रडू लागला....
घरात 27 वर्षाची तरुणी बायको माझी 
रडकावण्या डोळ्यांनी पाहत होती
लवकर माघारी या धनी 
रडलेल्या आवाजाने म्हणत होती
हात पकडुन असलेली चिमुरडी माझी 
माझ्याच बाजूला खेळत होती
बाबा गावाला जात आहात तर 
मला खेळण्यासाठी विमान आणा 
अस ती हर्षाने बोलत होती
पण माझ्या चिमुरडीला काय माहीत
ते येणारं विमान तिच्या बाबांचं च असणार आहे....
चिमुकली ने अस बोलताच
डोळ्यातील अश्रू पापणीवर 
येऊन स्तब्ध झाले होते.
मी आणेल बेटा तुला विमान 
अस बोलून पावलं माझे 
सीमेवर जायला निघाले होते....
जय हिंद....🇮🇪🇮🇪
स्वप्नकवी....✍🏻✍🏻🪴🌱



Tuesday, December 14, 2021

मी मलाच छळले होते

असे काय होऊन गेले होते
विचार सारे उधळले होते
एकटीनेच सारे सोसले होते
मी माझे मलाच छळले होते
सारे त्यांच्या विश्वात गुंतले होते
काय होती माझी चूक
सारे एकटीलाच सोसावे लागले होते 
कदाचित नशिबानेच मला छळले होते
विचार माझे कमी पडले 
असे मला वाटले होते
किंवा आत्मविश्वास माझा कमी असावं 
असे मी गृहीत धरले होते
पण ना जाणे काय झाले होते 
मी माझे मलाच छळले होते
दुसऱ्यांसाठी जगता जगता 
विचार लोकांना वाटले होते 
वाटलं हीच होती का माझी चूक 
तेव्हा मी मलाच छळले होते....

स्वप्नकवी....✍🏻✍🏻🌱🪴

छंद आहे मज लिहिण्याचा

छंद आहे मज लिहिण्याचा 
शब्दांना माझे मित्र बनवण्याचा
प्रेमाने कवितेला हाक मारण्याचा
जणू मोहर सुगंध प्राजक्ताचा
छंद आहे मज लिहिण्याचा.....
नाव आहे माझं स्वप्न
शब्दांना काम आहे माझं जपणं
छंद आहे मज असा की 
स्वप्नातही शब्दांना जोडण्याचा....
स्वतःला कवितेत गुंतवून 
शब्दांना आपलं करण्याचा 
छंद आहे मज लिहिण्याचा....

स्वप्नकवी....✍🏻✍🏻🌱🪴




Saturday, December 11, 2021

चला नवीन संकल्प घेऊ

चला संकल्प आता नवीन घेऊ
मनातील स्वप्न पुन्हा नव्याने रंगवू
नवीन वर्ष सुरू होईल आता 
मागे झाले ते विसरून जाऊ
चला नवीन संकल्प आपण घेऊ

आयुष्याची सुरुवात नव्याने करू
येणाऱ्या अडचणी धाडसी ने सह देऊ
समाजाच्या ऐक्यासाठी
माणुसकीची मशाल पेटवू
चला संकल्प आता नवीन घेऊ....

मिटवू हा जातीयवाद
सर्व वादाना सामोरे जाऊ
देशाच्या या भल्यासाठी
माणुसकी हा धर्म जागवू
चला नवीन संकल्प आपण घेऊ

स्वप्नकवी...🌱🪴✍🏻✍🏻


Friday, December 10, 2021

नातं धरणी माय च अन बळीराजाच

नातं असते म्हणे माय 
बळीराजाच आन धरणी माय च
कोन्ही संग नसं तव्हा
धरणी माय च्या कुशीत डोक ठेवून निजायच....

वावरात जातो बळीराजा
आन धसा धसा रडतो
दुष्काळ पडला पाण्याचा 
धरणी माय च्या किरा 
त्याच्या डोईच्या धारानी भरतो

कसं सांगू धरणी माय 
देव हा कोपला...
माया नशिबानं देवा 
तू कुठं रे लपला... 

तुह्य मह्य नातं... बळीराजा 
माय लेकाचं हाय र....
कष्टाचं फय तूले भेटिन
नग रडू बळीराजा
तुले मही शपथ हाय र....

स्वप्नकवी....🪴🌱✍🏻✍🏻

Thursday, December 9, 2021

मौन तुझे बोलके होते



 मौन तुझे बोलके होते 

ओठ तुझे अबोल होते

डोळ्यातून सारे कळत होते

म्हणणे माझे इतकेच होते पण

तुझ्या ओठांनी ते ऐकायचे होते

शब्द तुझे ओळखायचे होते

पण तुला ते लपवायचे होते

कारण काय ते माहीत नाही पण 

तुला माझे प्रेम नकोच होते

ते पण मला तुझ्याच 

ओठांनी ऐकायचे होते....


स्वप्नकवी.....🪴🌱✍🏻....


Tuesday, December 7, 2021

सुरुवात...

प्रेमळ शब्दांची सुरुवात आपण करूया....
निसर्गाच्या कुशीत घर आपलं बसवू या....
प्रेमाच्या भावना हृदयी आपल्या ठेवूया....
डावपेच मनातील काढून टाकू या...
सुरुवात आपण शब्दांची प्रेमाने करूया....


स्वप्नकवी....(sapna patil)....✍🏻✍🏻✍🏻

Sunday, December 5, 2021

वेदनेचे पहारे....


 

मनात खूप वेदना होतात 

जेव्हा आठवण तुझी येते 

तुझ्या एक एक क्षणाची 

आठवण मनात साठवून जाते

नाही विसरू शकत मी तुला

तुझ्या मनातील भावनांना

सारखी आस तुझी 

मनास वेड लावून जाते

पण मीच असा घाव दिला तुझ्या मनाला 

की तू आता मला विसरायला भाग पाडले

मी स्वप्न तुझे तोडून गेली सारे

खूप झालं माझं....

नाही द्यायचे तुला आता ते वेदनेचे पहारे.....

स्वप्नकवी.....✍🏻✍🏻✍🏻✍🏻

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...