कोरोना या विषाणूंमुळे होणाऱ्या covid-19 या महामारी चा मुकाबला करण्यासाठी सर्व प्रशासन सज्ज आहे.आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्याच आरोग्यासाठी पोलिस प्रशासनाकडून काही निर्बंध आणि काही मनाई आदेश पाळण्यात आलेले आहेत.आपल्याला माहीत आहे की हा साथीचा रोग आहे .साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 पासून आज 144 13 क्रिमिनल प्रोसेजर कोड प्रमाणे काही आदेश पोलिस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आहे आहेत.हे आदेश काढल्यामुळे काही ठिकाणी नागरिकांचे खूप संघर्ष होताना दिसत आहेत.मी पहिल्यांदा तुम्हाला हेच सांगू इच्छिते की, हे कायदे आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आपल्याच कुटुंबियांच्या आरोग्यासाठी आहेत. 144 13 या मनाई आदेश प्रमाणे कुठल्याही खाजगी किंवा सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पाच किंवा पाश पेक्षा जास्त लोकांना एकत्रित येतं येणार नाही. या सर्वांवर बंदी घातली आहे. आज जो आपण मनाई आदेश पाळलेला आहे त्याप्रमाणे कुठल्याही खाजगी वाहतुकीला सुद्धा परवानगी देता येणार नाही. त्याला काही conditions आहेत . त्यामध्ये मेडिकल एमर्जन्सी , अत्यावश्यक सेवेसाठी एखादा व्यक्ती जात असेल तर त्यासाठी आपल्याला मुभा देण्यात आली आहे.
कोरोना हा एक प्रकारे संसर्गाने पसरणारा एकमेकांना स्पर्श केल्यानंतर होणारा आजार आहे. म्हणून प्रशासनाने आपल्यासाठी काही निर्णय घेतले आहेत.clubs, malls अशा अनेक ठिकाणी गर्दी होत असते. अशा ठिकाणी बंदी घातली आहे. आपल्या सेवेसाठी किंवा आपल्याला ज्या गोष्टी अत्यावश्यक आहेत उदा. धान्य , भाजीपाला असेल या वस्तू आपल्याला चालत प्रत्येक ठिकाणी मिळतील या दृष्टिकोन प्रशासनानं सविस्तर अशी यंत्रणा उभी केलेली आहे. यासाठी सर्व राज्य सरकार प्रयत्न करत आहेत.पण विनाकारण रस्त्यावर येणे किंवा विनाकारण ट्रीपल सिट फिरणे असे बरचसे प्रकार एवढं सगळ होऊन सुद्धा दिसून येत आहेत.म्हणून मी हेच सांगू इच्छिते की हे निर्बंध आपल्या आरोग्याच्या कळजीतून आपल्याच कुठुंबियांच्या सुरक्षितता तून आपल्या वर लावले गेले आहे. पोलिस प्रशासन , युनिक प्रशासन , आरोग्य प्रशासन शासनाचे सर्व विभाग दिवसाचे रात्र करून रात्रीचा दिवस करून आपल्यासाठी कार्यरत आहेत.आपली सुरक्षितता हीच आपली जबाबदारी आहे. आपण यात कुठलाही चुकीचं वातावरण तयार न करता आपण एकजुटीने या संकटाशी सामना करूयात. असे मी आपण सर्वांना नम्रपणे आव्हाहन करते........🙏🙏
जय हिंद जय महाराष्ट्र.......
Sapna patil...... ✍️✍️✍️
chhan👌👌
ReplyDelete