डोळे मिटून बघितले मी तर दिसलास तू मला
एकाच तुझ्या त्या नशीली नजरेने घायाळ केले मला
गुंतून गेले मी पूर्ण तुझ्यात स्वताला ही हरवून बसले
डोळे मिटून पाहता मी तुझे ते सुंदर हास्य रूप मला दिसले
तुझा निरागस हसरा चेहरा पाहून मी भाऊक होऊन गेले
डोळे मिटताच क्षणी मन माझे तुझ्यात विलीन होऊन गेले
कधी न पाहीले मी तुला न तू मला कधी पाहीले
पण न जाणे काय होते आपल्यात...प्रेमाचे बंध हे जुळले
प्रत्यक्ष तुला मी नजरेने कधी न पाहिले
तरीही डोळे मिटताच क्षणी तुझेच प्रतिबिंब दिसले
अशाच आपल्या नजरेने न पाहिलेल्या प्रेमाला कायम राहू दे.....आणि माझी जी एक इच्छा आहे जी तुला माहीत आहे ती पूर्ण होऊ दे...... 😊
Sapna patil.......✍️
No comments:
Post a Comment