Thursday, July 20, 2023

ती नजर

प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त शब्दांची गरज नसते
ते तर डोळ्यातून ही व्यक्त होत असते....
तीच नजर तोच चेहरा अगदी पूर्णपणे डोळ्यात साठवून जातो...
मग हुरहूर लागते जीवाला 
सारखं सारखं त्याच नजरेस बघण्याची
त्याला खूप जवळून अनुभवण्याची
एकटक बघतच रहावस वाटत 
आजूबाजूला कितीही आवाज असला तरीही ऐकायला येऊ नये ....
फक्त आणि फक्त त्याच्या हृदयाचे ठोके 
त्या घड्याळाच्या काट्यासारखे टिकटिक वाजावे....
अशीच काहीशी स्थिती तेव्हा झालेली असते...
अनोळखी असूनही त्याच्या नजरेत बघावस वाटत...
एकटं एकटं रहावस वाटत...
त्याला नजरेसमोर आणावस वाटत
फक्त त्याच्याच स्वप्नात बुडून जावं स वाटत...
अन् दोघांच्या नजरा एकमेकास भिडताच
तीच ते बाजूला नजर करून लाजणं.... आणि
एकटच गालात हसणं....
खूपच भारी फिलिंग असते ती...
अन् हळुच ओठातून कवितेच्या ओळी बाहेर पडाव्या....
कदाचित यालाच प्रेम म्हणाव..
.
.
.
यावा तू असा स्वप्नात माझ्या
अन् हरवून जावं मी नजरेत तुझ्या
भरून जावी ती ओंजळ फुलांनी
अन् गुंतून जावा तू स्पंदनात माझ्या....


निशब्द

तुझ्या प्रेमाच्या ओघात 
मी एवढं वाहवून जावं
की भावना ही अनावर होऊन जाव्या
अन् मी निशब्द होऊन जावं....

स्तब्ध व्हाव्या भावना ही माझ्या
स्वतःस एवढं झोकून द्यावं
नकळत तुझ्या प्रेमाच्या लाटेत 
स्वतःस पूर्ण वाहवून द्यावं...


Tuesday, July 4, 2023

भेटशील का पुन्हा

भेटशील का पुन्हा नव्याने त्याच वाटेवर 
जिथं आपली मन जुळली होती
बघताच क्षणी तुला मी 
तुझ्यात हरवून गेली होती

अपूर्ण आहे हे जगणं तुझ्याविना
भेटशील का पुन्हा एकदा त्याच वाटेवर
जपून ठवलाय तुझ्या आठवणींना.... तरीपण
कोरून दे ना तुझं नाव पुन्हा एकदा माझ्या मनावर


Saturday, July 1, 2023

happy birthday Madhuri madam

परीसस्पर्श माझ्या लेखणीचा 
आज शब्दांना होऊ दे
वाढदिवस आहे तुझा
त्यात उधळून रंग प्रेमाचे भरू दे
कधी रुसवे कधी फुगवे
चालूच राहतील आयुष्यभर
सोडून देऊ राग द्वेष मनातील
मैत्री निभावू आपण जीवनभर....
माधुर्य हे तुमच्या
रुजते सदा मनी
अखंड वात तेवत राहो
नेहमी तुमच्या जीवनी....

वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा मॅडम.....



happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...