Monday, March 21, 2022

कविता दीन

मनातील साठवलेल्या शब्दांना पालवी फुटावी....
अन् ती अलगद ओठांपर्यंत यावी....
हळूच निळ्या शाईने कोऱ्या कागदावर उतरावी....
स्वप्न तिचे घेऊन सुरुवात तिची व्हावी....
भावनांच्या शब्दांना अर्थ देऊन अन्
प्रेमाच्या शब्दाशब्दाना जुळवून 
कविता मी लिहावी.... जणू
रातराणीच्या फुलासारखी हळूच बहरावी....
गुंतून कवितेत ती स्वप्नमयी व्हावी....
अशीच शब्दाशब्दंची जुळवणी करून 
मी कविता लिहावी....

21/03/2022
सर्वांना जागतिक कविता दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...💐💐💐

स्वप्नमयी.....✍🏻✍🏻✍🏻

Saturday, March 5, 2022

जे वेदना आहे तुला,
तीच वेदना मलाही आहे..
किती सहन करतेस,
त्याची जाणीव मलाही आहे... 

दिसत नाही वेदना
जग फक्त हसणार आहे..
आपण बनवू आपलं जग
जिथे तू अन मी असणार आहे...

वाहणाऱ्या आसवांना
अलगद ओठांनी टिपायचं आहे,
तुला मिठीत घेऊन
स्वतः पेक्षा जास्त जपायचं आहे...

प्रेम जितकं करतेस,
त्याहून मी जास्तच करेन,
स्पर्शाची भूक नाही मला
तुझ्या डोळ्यात स्वतःला बघेन...

विश्वास ठेवलास माझ्यावर,
तोच माझ्यासाठी अमुल्य आहे,
तुझ्या सोबत जगणं नसेल तर,
तुझ्या सोबत मरणं कबूल आहे....


..

happy birthday sir

पर्व नव्या आयुष्याचे पुन्हा रंगून यावे वसा चालवूनी संस्कारांचा तूम्ही कीर्तिवंत व्हावे नकळत झाल्या असतील चुका त्यावर पांघरून घ्यावे सुखाचे झ...