Tuesday, July 4, 2023

भेटशील का पुन्हा

भेटशील का पुन्हा नव्याने त्याच वाटेवर 
जिथं आपली मन जुळली होती
बघताच क्षणी तुला मी 
तुझ्यात हरवून गेली होती

अपूर्ण आहे हे जगणं तुझ्याविना
भेटशील का पुन्हा एकदा त्याच वाटेवर
जपून ठवलाय तुझ्या आठवणींना.... तरीपण
कोरून दे ना तुझं नाव पुन्हा एकदा माझ्या मनावर


Saturday, July 1, 2023

happy birthday Madhuri madam

परीसस्पर्श माझ्या लेखणीचा 
आज शब्दांना होऊ दे
वाढदिवस आहे तुझा
त्यात उधळून रंग प्रेमाचे भरू दे
कधी रुसवे कधी फुगवे
चालूच राहतील आयुष्यभर
सोडून देऊ राग द्वेष मनातील
मैत्री निभावू आपण जीवनभर....
माधुर्य हे तुमच्या
रुजते सदा मनी
अखंड वात तेवत राहो
नेहमी तुमच्या जीवनी....

वाढदिवसाच्या तुम्हाला लक्ष लक्ष शुभेच्छा मॅडम.....



Tuesday, June 20, 2023

दुखावले ल मन


किती भरलाय हे मन माझं 
कुठं रितं करायला जागाच नाहीय....
सगळे झालेत परके तर
कुणीच आपल उरलं नाहीय

कुठं रितं करू या दुःखाच्या भावना
मनातील गुजगोष्टी ना आता जागाच उरली नाहीय
लिहावं म्हटल त्यांना कोऱ्या वहीच्या कागदावर
तिथं पण मात्र लिहायला शाईच उरली नाहीय...

मन हलकं होईल म्हटल 
सांगून मनातील सर्व काही
ते सांगण्यासाठी सुद्धा 
आता मनच उरली नाहीय...

असं पण असतं का रे 
मनाला सांभाळणार कुणीतरी पाहिजेच म्हणून 
नसेल जर तसं आयुष्यात कुणी
सोडून द्यावं का आपण ते तसं जगणं म्हणून

Monday, June 5, 2023

शिवराज्याभिषेक सोहळा.....🚩🚩


महाराष्ट्राच्या दर्या खोऱ्यात
घुमला तो आवाज सनईचा
वात होऊन जळला जळला
तो शिवबा जिजाईचा...

सजला आज रायगड
लक्ष लक्ष दिव्यांनी 
जिंकला तो किल्ला
फक्त माझ्या छ्त्रपती राजांनी....

घडवले असे मावळे की 
त्यांची कधीच नाहीय 
कुणाच्या आया बहिणीवर नजर
म्हणूनच आख्या महाराष्ट्रात आहे 
फक्त एकच गजर फक्त एकच गजर .....

बसला माझा राजा 
त्या रायगडाच्या सिंहासनावर
म्हणूनच आज अख्या जगाच्या 
नजरा आहेत फक्त माझ्या शिवरायांवर....

ती नजर की प्रेम

प्रेम व्यक्त करण्यासाठी फक्त शब्दांची गरज नसते
ते तर डोळ्यातून ही व्यक्त होत असते....
तीच नजर तोच चेहरा अगदी पूर्णपणे डोळ्यात साठवून जातो...
मग हुरहूर लागते जीवाला 
सारखं सारखं त्याच नजरेस बघण्याची
त्याला खूप जवळून अनुभवण्याची
एकटक बघतच रहावस वाटत 
आजूबाजूला कितीही आवाज असला तरीही ऐकायला येऊ नये ....
फक्त आणि फक्त त्याच्या हृदयाचे ठोके 
त्या घड्याळाच्या कत्यासारखे टिकटिक वाजावे....
अशीच काहीशी स्थिती तेव्हा झालेली असते...
अनोळखी असूनही त्याच्या नजरेत बघावस वाटत...
एकटं एकटं रहावस वाटत...
त्याला नजरेसमोर आणावस वाटत
फक्त त्याच्याच स्वप्नात बुडून जावं स वाटत...
अन् दोघांच्या नजरा एकमेकास भिडताच
तीच ते बाजूला नजर करून लाजणं.... आणि
एकटच गालात हसणं....
खूपच भारी फिलिंग असते ती...
अन् हलच ओठातून कवितेच्या ओळी बाहेर पडाव्या....
कदाचित यालाच प्रेम म्हणाव..
.
.
.
यावा तू असा स्वप्नात माझ्या
अन् हरवून जावं मी नजरेत तुझ्या
भरून जावी ती ओंजळ फुलांनी
अन् गुंतून जवा तू स्पंदनात माझ्या....




Monday, May 22, 2023

व्यथा शेतकऱ्याची

दुष्काळ पडला व्हता जव्हा 
तव्हा काळीज मह्य फाटलं व्हतं....
भुकेल व्हतं लेकरू मह्य 
तेव्हा ते कुशीत मह्या निजल व्हतं

पडत व्हते माह्या डोयातले आसू
तेव्हा बांध माह्या फुटला व्हता
माह्या काळजाची भोक पाहून 
तो एकटाच रडत बसला व्हता

एका येळची भाकर बी 
जव्हा भेटत नाय खायाले 
घाम गाळून गाळून माय
चटका लागतो व पायाले 

उन्हातान्हात भटकतो माय
अन फिरतो अनवाणी
चटके लागिस काळजाले 
जिवाचं व्हते पाणी पाणी

पोरीचं लगीन करीन 
व्हतं सपान मी पाहिल
कसं सांगू माय तुले
संबध मनातच राहिलं

मोठा साहेब करीन पोरा तूले
पोराले सांगून ठेवलं व्हतं
पण आता कसं सांगू त्याले
की तुझ्या बापाचं रांघत बी
त्या दुष्काळात वायल व्हतं

व्हत्याच नव्हतं झालं
मुठभर धान्य घरात आलं
पण काय सांगू हो तुम्हाला
तिथं बी सरकार आडव आल...

दोन पैक भेटिन म्हणून
धन्य मार्केट ला नेलं
नव्हता भाव माह्या सोण्याले
संबंध काही मातीमोल झालं....

एवढीच विनंती आहे सरकारला 
की सरकार मायबाप
करू नका हो माझ्या 
बळीराजा वर अत्याचार
नको त्याला गाडी 
नको त्याला बंगला
पण पोटभर भाकर 
त्याच्या कष्टाची 
मिळू द्या सरकार
तुम्ही मिळू द्या सरकार 




Wednesday, May 17, 2023

respected sir 2

लाख रुतले होते हो 
पायात काटे माझ्या
पण कधी डगमगले नाही
स्वप्न होते मनात माझ्या
मी कधीच हरलो नाही
साथ कुणाची नसतानाही
मी माघार कधी घेतली नाही
जबाबदारीच ओझं वाहताना
मी कधीच पडलो नाही.....
मी कधीच हरलो नाही...
जिंकायचं होत मला हे आयुष्य
ध्येयाची वाट मी कधी सोडली नाही
धडपडत फरफटत होतो मी
मी कधीच रडलो नाही....
मी कधीच हरलो नाही...
अनेक आले वाटेत काटे माझ्या
तरीही एक एक पाऊल पुढे टाकत गेलो
साथ होती फक्त नशीबाची मला
स्वप्न नवे आयुष्याचे रंगत गेलो
अवघड होत्या त्या प्रत्येक वाटा
आयुष्याच्या वळणावरती
तरीही अफाट प्रयत्न करत गेलो
कधीही झुकलो नाही कुणासमोर
स्वतःवर विश्वास ठेवत गेलो
लाख रुतले होते हो 
पायात काटे माझ्या
पण कधी डगमगले नाही
स्वप्न होते मनात माझ्या
मी कधीच हरलो नाही


खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी