तर स्त्रीला लागलेले ग्रहण
खूप सार देऊनही
तिला करावे लागते सहन
आज किती तरी मुली
जगत आहेत लाचारीचे जीवन
हुंडा हाच तिला
लागलेले खूप मोठे ग्रहण
लाचार होऊन बाप ही
लग्न मुलीचे लावून देतो
हुंडा देऊनही मुलीला
अत्याचार सहन करावा लागतो
सासू सासरे नवरा देतात
मिळून सुनेला त्रास
त्यांना फक्त हवा असतो पैसा
घाबरत नाही ते तिला द्यायला फास
अशी आली वेळ तिच्यावर
तेव्हा मायबापची ही साथ नसते
आली तशीच मागे परत जा शब्द ऐकून
ती स्वतःचाच बळी देत असते
अरे नका करू तुम्ही
तिच्यावर अत्याचार
मुलगी आहे म्हणून
तिला नका समजू लाचार
घेऊ द्या तिला शिक्षण
तिच्या पंखात बळ द्या
लढेल ती एकटीच
तिला स्वतःच फ्रीडम द्या
कित्येक मुलींचे गेलेत
हुंद्यामुळे बळी
ती पण असते ना मायबापाची
एकुलती एक कळी
जागे व्हा रे आता
करू नका या पैशांचा व्यापार
विकून का करत आहेत
ती मुलगी आहे म्हणून
तिच्या स्वप्नांचा बाजार
हुंडाबळी एक सामाजिक समस्या
आहे ना तुम्हाला मान्य
तरी स्वतःच्या घरी सून
आणताना का करता तुम्ही हे अमान्य
हुंडा देणे आणि घेणे
आहे सामाजिक गुन्हा
चला करूया प्रयत्न सर्वांनी
हुंडाबळी जाऊ नये पुन्हा पुन्हा...