Tuesday, October 5, 2021

शब्दात कसे सांगू

 एवढे प्रेम करते तुझ्यावर की त्याला 

कसे मांडू शब्दात हेच मला कळेना

मांडले मी आपले प्रेम शब्दात तर 

त्या शब्दांना अर्थ काही सुचेना


तू पाहिले माझ्या डोळ्यात तुला

तर कळल्या तुला माझ्या भावना

पण भावनांना शब्दात मांडायचे होते 

ते मांडण्यासाठी शब्दच काही सुचेना


खरच प्रेम आहे तुझं की नुसता मला 

भासावतोय तू हेच मला कळेना

पुन्हा पुन्हा मला त्याचं प्रश्नावर 

आणून ठेवतोय हेच मला समजेना... आणि मग 

त्याला शब्दात कसे मांडू हेच मला कळेना....


Sapna patil....✍️



भीती वाटते तुला गमावण्याची

 खूप काही बोलायचे होते तुझ्याशी....

पण एकटे पणाची भीती वाटते....

शेवटपर्यंत चालायचे होते रे तुझ्यासोबत

पण त्या वाटेवर पण तुझी साथ 

सुटण्याची भीती वाटते...

खूप वाटते रे मला तुझ्या 

नजरेला नजर द्यावी 

पण त्या नजरेतील प्रेमाला 

मला सांभाळता येईल की 

नाही याची भीती वाटते....

तुला खूप घट्ट मिठी 

मारावी शी वाटते पण 

नंतर मनाला सावरता येईल 

की नाही याची भीती वाटते

तुझ्यासाठी जीव पण 

द्यावासा वाटतो पण

तू माझ्याशिवाय या 

जगात एकटा कसा 

राहशील याची भीती वाटते...

तुझ्यासोबत आयुष्भर 

जगावेसे वाटते पण 

तुला माझ्या वागण्याचं त्रास 

होईल याची भीती वाटते

तुला माझ्या वागण्याचं 

त्रास होईल म्हणून तुझ्या 

आयुष्यातून निघून जावेसे वाटते पण

मला तुझ्याशिवाय जवळच 

म्हणणार कुणीच नाही मी एकटी 

पडेल आणि तुला ही 

माझ्यासारखं आपलस 

म्हणणार कुणीच राहणार 

नाही याची भीती वाटते....

तुला तर मिळून जाईल दुसर 

कुणीतरी पण मी जिवंत 

असूनही मेलेली असेल 

याची भीती वाटते....

प्रेम तर मी खूप करते तुझ्यावर पण 

ते तुझ्यासमोर आता त्याला 

व्यक्त करण्याची पण भीती वाटते...


Sapna patil....✍✍✍



सांभाळून घेशील ना

 


त्या काटेरी वाटेवर चालताना

चुकलेच मी कधी तर तू 

साथ मला देशील ना

तोल माझा गेला नकळत 

तर तू सांभाळून घेशील ना


हळव्या माझ्या मनाला

तुझ्या प्रेमाची साद तू देशील ना

डोळे आहे भरलेले अश्रूंनी माझे

त्यांना हळुवार तू पुसशिल ना


लाख चूक्या करते मी 

ती माझी सवयच आहे

पण त्या माझ्या चुका 

तू सुधारून घेशील ना

सांग ना सांभाळून 

तू मला घेशील ना....

Sapna patil....✍️



विरह सरता सरेना



विरह सरता सरेना...

किती वाट पाहू तुझी

रात्र ही संपता संपेना

दिवस कसाबसा जाई

रात्र ही पूर्ण विरहात होई 

विरहात तुझ्या

गहीवरल्या माझ्या 

डोळ्यांच्या पापण्या

रात्र मात्र संपता संपेना

एक एक क्षण 

हा एकटा झाला 

ही काळोखी रात्र 

काही केल्या संपेना

किती हा मोठा 

विरह सरता सरेणा

उणीव तुझी सहन 

मजला होईना

मनी विचार तुझाच 

विरह सरता सारेना 

आठवणी राहिल्या 

आहेत आता फक्त 

विचार काही थांबेना 

किती वाट पाहू तुझी 

ही काळोखी रात्र 

संपता संपेना

Saapna patil ✍️✍️



हक्काने रुसण

 तुझं ते हक्कान माझ्यावर 

रुसण खूप आवडत मला

मी तुझ्यात गुंतत जाते 

मग तूच सावरतोस मला...😘


तुझं ते हक्काने माझ्यावर 

रागावणं आणि तुझं रागात 

नाक लाल होण खूप आवडते मला...😜

मग तेव्हा माझं प्रेमाने मनवणं 

खूप आवडते तुला.....


तुझं ते हक्काने माझ्यासोबत 

भांडणं खूप आवडते मला

मग मी पण तुझ्यासोबत जोरात भांडते 

तेव्हा खरच ही माझीच आहे अस वाटते तुला...😄😄


तू जेव्हा फुगून बसतो माझ्यावर 

तेव्हा खूप भारी दिसतो तू मला

अस वाटत तुझा तो फुगा फोडून 

माझ्या कुशीत घेऊन झोपवाव तुला....


Sapna patil....✍️✍️✍️✍️



तुझा भास

 कधी मन तुझ्यात गुंतल 

कधी मला कळलंच नाही

दिवसा मागे दिवस जातात 

पण तुझ्या आठवणी कधी जातच नाही

क्षण भर येतोस नजरेसमोर 

अन् लगेच स्वप्न होऊन जातोस 

खूप खोलवर रुजतात तुझ्या आठवणी

त्यांना सहज विसरता ही येत नाही

अश्रूंची ही केलीय मी आता पाठवणी 

माझी मीच उरले आहे आता आणि 

सोबत आहेत तुझ्या फक्त आठवणी

होतो कधी कधी तू असल्याचा भास मला

तू नाहीस तरीही वाटत तू परत यावं आणि मी भेटाव तुला

पण न जाणे कशाची आस मी धरावी

क्षणात तुझी सावली माझा भास होऊन जावी....

Sapna patil ✍️✍️



डोळे मिटून पाहताना

 


डोळे मिटून पाहताना 

तुझेच प्रतिबिंब पाहिले मी

अंतर्मनात डोकावताना

फक्त तुला शोधीले मी

तुझ्याविना राहू कशी मी

माझ्या डोळ्यात तर 

तुझेच प्रतिबिंब आहे

माझ्या अंतर्मनात डोकावून 

तर बघ......

त्यात पण तुलाच रेखाटलय मी

तू नाही आहेस तरी पण माझ्या 

डोळ्यात तुला पाहते मी 

माझ्या अंतर्मनात पण फक्त 

तुझच प्रतिबिंब कोरलय मी

तुला माझ्या डोळ्यात पाहून 

मन भरून येत माझं

म्हणून माझ्या कवितेत 

तुला व्यक्त करते मी

माझ्या अंतर्मनात डोकावून तर बघ 

त्यात पण तुलाच लिहिलय मी.....

तुझ्या सोबतचा एक एक क्षण

खूप जपलय मी

माझ्या अंतर्मनात पण तूझ्या

आठवणींना कोरून ठेवलंय मी


Sapna.....✍️



खिडकी

खिडकीच उघडून झालं वाऱ्याशी झगडून झालं हातात चहाचा कप घेऊन जरा स्वतःशी बोलून झालं . . . . . नेहमी आठवणीत राहशील तू . . . . . खिडकी